गुणवत्तेत पुढे असणाऱ्या शाळेचे गांवही समृध्द असते : प्रा. सुषमा पाटील.
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : ज्या गावची शाळा गुणवत्तेत मोठी असते तेच गांव खऱ्या अर्थाने समृध्द असते असे प्रतिपादन मेन राजाराम कॉलेज कोल्हापूरच्या प्रा.सुषमा पाटील यांनी केले.त्या विद्या मंदिर बशाचामोळा (ता भुदरगड ) येथील जिर्णोध्दार केलेल्या या नुतन शाळेच्या उद्घाटनप्रसंगी तसेच
यावेळी कै हिराबाई रामचंद्र पाटील (कोनवडे ) याचे स्मृती प्रित्यर्थ सर्व शालेय विद्यार्थ्याना स्पोर्टस कीट वाटप व शैक्षणीक साहित्य वाटप या संयुक्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रा हिंदुराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
या शाळेचे उद्धाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना सुषमा पाटील पुढे म्हणाल्या की, “आई ही मुलांची पहिली शाळा असते व शाळा ही मुलाची दुसरी आई असते.घरात जर जिजाऊ असेल तर दाराघरात शिवबा नक्की दिसेल. गावाला पत,शेताला खत व कुटुंबात एकमत असेल तर मुलांचा नक्की विकास व प्रगती होईल.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी शाळेबध्दल गौरवाचे उद्गार काढले, तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संभाजी पाटील यांनीही शाळा उठावाबध्दल शिक्षक व ग्रामस्थांचे कौतुक केले.
कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचा सत्कार शाळा समिती, शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी माने साहेब, मंदिर तिटवे ता राधानगरी चे अध्यापक जे आर पाटील, केंद्रप्रमुख कुकडे,डी डी पाटील, रवि नागटिळे, बी एस पाटील, दत्ता कडव आदी शिक्षक मांन्यवर उपस्थीत होते.एकनाथ पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर दिग्वीजय कोटकर यांनी आभार मानले. किट वाटप , शैक्षणीक साहीत्य वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचा सत्कार ग्रा. पं .,शाळा समिती, शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी माने साहेब, मंदिर तिटवे ता राधानगरीचे अध्यापक जे .आर .पाटील, सरपंच सौ संकपाळ डे . सरपंच, उद्योगपती श्री . चंद्रकांत पवार, केंद्रप्रमुख कुकडे,डी. डी .पाटील, रविंद्र नागटिळे, बी . एस . पाटील, सचिन देसाई ,उत्तम पवार, डी. जी . पाटील,दत्तात्रय कडव , सर्जेराव देसाई , कुंडलिक देसाई ,व्ही एम . पाटील आदी शिक्षक मान्यवरासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकनाथ पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर दिग्वीजय कोटकर यांनी आभार मानले .






