Pune

मंदिर मशिदी मध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा शाळांमध्ये खर्च करा आणि पहा काय बदल होतो…ना बच्चू कडू

मंदिर मशिदी मध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा शाळांमध्ये खर्च करा आणि पहा काय बदल होतो…ना बच्चू कडू

दत्ता पारेकर

पुणे मी नेहमी पहातोय शाळेत जाणाऱ्यांची संख्या कमी अन् मंदिर, मस्जिदी मध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय, शहिदांच्या स्थळी जाणारे लोक फार कमी दिसतात, पण जिथे आशिर्वाद मिळतो तिथं अधिक लोक हजेरी लावतात. बच्चू कडू यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या वाभळेवाडी शाळेला भेट दिली यावेळी ते बोलत होते.

अशोकरावांच्या मतदारसंघात हि शाळा आहे हे भाग्याचं आहे. अशोकराव अन् त्यांच्या नावामागं पवार आहे अन् सध्या पवारांच्याच खेळीमुळं सगळं चालू आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

मला गावकऱ्यांचा अभिमान वाटतो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या वाटतात, ज्यांनी शाळेसाठी वर्गणी गोळा केली, जमिनी दिल्या अन् ही शाळा बांधली. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे पण वाघीणीच्या दूधात आता पाणी किती आलं हे तपासण्याची गरज आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचा हात तोडावे लागतील कारण शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांच भवितव्य अवलंबून आहे, असंही यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही आम्ही जर मनात आणलं तर जेवढ्या मंदिर अन् मस्जिद आहेत तेवढ्याच भक्कम शाळा आपण उभारू शकतो, पण तुमच्या आणि आमच्या डोक्यातून जात आणि धर्म जात नाही. तुम्ही परंपरेनं ग्रासून गेलेले लोक आहात. जेवढ्या येरझाऱ्या आपण मंदिर आणि मस्जिदमध्ये मारतो तेवढ्या येरझाऱ्या जर गावातल्या लोकांनी शाळेत टाकायला सुरूवात केली तर चित्र बदलल्याशिवाय रहाणार नाही असं बच्चू कडू म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button