श्री शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजचे सुभाष भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
कोल्हापूर प्रतिनिधी-तुकाराम पाटील
श्री शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज चे माध्यमिक विभागातील शिक्षक सुभाष कृष्णा भोसले यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल गरूड भरारी फाउंडेशनचा २०२० चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्य संपादक अनिल चव्हाण यांनी जाहीर केला.
पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी संस्थेच्या वर्धापनानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन ,दसरा चौक कोल्हापूर येथे खासदार धैर्यशील माने,आमदार चंद्रकांत जाधव,महापौर सुरमंजिरी लाटकर,शारंगधर देशमुख,शिक्षक नेते दादासाहेब लाड ,डी.वाय. कदम ,टी.एस. कडवेकर,प्रा. डॉ चद्रकुमार नलगे यांच्या हस्ते तर मुख्य संपादक अनिल चव्हाण् ,कार्यकारी संपादक सुनिल चव्हाण उपसंपादक रविंद्र मोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या निवडीकामी प्राचार्य जे.डी. पाटील,उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी ,उपप्राचार्य बी के मडिवाळ यांचे मार्गदर्शन तर शिक्षण प्रसारक मडंळ कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष माजी प्राचार्य शिवाजीराव सावंत,पेट्रन सदस्य युवानेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी प्रा. डॉ.मंजिरीताई देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
सुभाष भोसले यांचे सर्व आजी -माजी विदयार्थी ,पालक ,शिक्षक बंधूभगिनी,मित्रपरिवार ,नातेवाईक यांचेकडून अभिनंदन होत आहे.






