Nashik

आरपीआय (आठवले)अहमदनगर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंदाताई पारखे यांचा उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

आरपीआय (आठवले)अहमदनगर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंदाताई पारखे यांचा उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

खऱ्या पॅंथर नेत्यांचा यापुढे रिपाईच्या वतीने सन्मान-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे..

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:अहमदनगर लोणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखेच्या वतीने अहमदनगर महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मंदाताई पारखे यांना नैनिताल येथे महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते लोणी नगर येथील रोकडे पॅलेस येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे होते.

याप्रसंगी अनिलभाई गांगुर्डे यांनी जाहीर केले की आंबेडकरी चळवळीतील खऱ्या पॅंथर योद्ध्यांचा यापुढे AlCOI ह्या जागतिक संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येईल.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र अनिल भाई गांगुर्डे महाराष्ट्र राज्य सचिव दीपक भाऊ गायकवाड उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोकराव घोडेराव शिर्डी शहराध्यक्ष कैलास शेजवळ दिंडोरी तालुका सरचिटणीस बाळासाहेब गांगुर्डे युवक तालुका उपाध्यक्ष मिलिंद भाऊ गांगुर्डे आंबेडकर चळवळीतील युवा नेते प्रमोद जी पगारे आदी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते विक्रांतभाऊ गांगुर्डे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button