सखाराम महाराज वाडी संस्थान पासून ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत घाण सांड पाण्याचा प्रश्न निकालात…
अमळनेर शहरातील वाहत असलेल्या बोरीनदीच्या विस्तृत पात्रात शहरातील सांडपाणी हे मोठ्या प्रमाणात साचुन संत सखाराम महाराज परिसरात घाणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.हा यक्ष प्रश्न सुटावा म्हणून मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कल्पक दृष्टीकोनातून बोरी नदीच्या पश्चिम किना-यावर असलेल्या श्रीसंत सखाराम महाराज वाडी संस्थान पासून ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुलापर्यंत गटारीचे बांधकाम करुन सांडपाण्याचा प्रश्न सोडविणेबाबत लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी यांना सुचविले होते.त्या अनुशंगाने नगरपरिषदेने ठरावाद्वारे मान्यता देवून सदरचे काम पुर्ण केलेले असून नदीपात्राच्या पश्चिमेकडील भागात साचणा-या पाण्याचा प्रश्न सुटलेला असून या भागातून वाहतुक देखील सुरळीत झालेली आहे.
वरील बाबीशी संलग्न असलेला बोरीनदीच्या पुर्वभागाकडील पैलाड परीसरातील सांडपाणी देखील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात येत होते.तसेच सदर भागात हागणदारी ठिकाण निश्चित झालेले होते.शासनाच्या निर्देशानुसार हागणदारीचे ठिकाण सुशोभीतल करण्याच्या सुचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.सदर शासन निर्देशाच्या अभ्यास करुन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी बोरी नदीच्या पश्चिमेकडील पात्रात केलेल्या मोठ्या गटारीसह रस्त्याच्या कामाच्या धर्तीवर नगरपरिषदेने श्रीसंत सखाराम महाराज पुल (मातंगवाडा) ते बोरीनदीवरील डाॅ.बाबबासाहेब आंबेडकर नवीन मोठ्या पुलापर्यंत मोठ्या गटारीसह भराव टाकुन रस्ता तयार करणे बाबत सुचविले होते.त्या अनुशंगाने नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र स्वच्छ अभियान योजनेच्या प्रोत्साहन अनुदानातून गटारीचे बांधकाम व पाईप टाकून भरावाचे काम देखील पुर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.पैलाड भागाकडील एकेकाळी घाणीचे साम्राज्य असलेला नदीकाठाचा भाग आज नजरेत भरुन येत आहे.तसेच पैलाड भागात समाजमंदीरापासून ते के.डी.गायकवाड शाळा या अरुंद मुख्य रस्त्यावरुन नागरीकांना रहदारीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती.सदर रस्त्याच्या कामामुळे पैलाड भागातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा यक्ष समस्या देखील सुटणार आहे.याठिकाणी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या दुरदृष्टीने घडवून आणलेला आमुलाग्र व ऐतिहासिक बदल पाहण्यासाठी परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने येत असुन सदर कामाची पाहणी करतांना मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,विनोद लांबोळे,उपनगराध्यक्ष,सुरेश पाटील,नगरसेवक व बांधकाम सभापती, मा.नगरसेवक संजय पाटील(भूतबापु) नगरसेवक मनोजबापु पाटील,बाबु साळंखे, हाजी शेखा मिस्तरी,संजय पाटील,बांधकाम अभियंता,ठाकुरसाहेब,इलेक्ट्रीक अभियंता,एकनाथ लांडगे,सुभाष भोई,संजय भोई,भाईदास भोई,दिनेश भोई,दिपक भोई,दिलीप कुंभार,रवी कुंभार,विजय पाटील,मुन्ना शिंपी,रविंद्र पाटील,ज्ञानेश्वर पाटील,भैया कंखरे,किरण पाटील तसेच स्थानिक परीसरातील नागरीक उपस्थित होते.






