माहितीच्या अधिकारात अपील धारकास तारीख व वेळ नसलेले जा क्र टाकलेले पत्र…गटविकास अधिकारी यांची सही…जेंव्हा अमळनेर येथील गटविकास अधिकारी यांची कमाल हागणदारी मुक्त गाव करता करता तारखा आणि वेळ च लिहायला विसरतात….
हागणदारी मुक्त गाव योजनेत थोडं फार कौतुक झालं जे की करायला नको कारण ते त्यांचं काम करत आहेत त्याचा पगार घेत आहेत परंतु काय आहे ना काम थोडं करायचं आणि बोभाटा जास्त करायचा या नादात बिचारे गटविकास अधिकारी मुख्य कामे विसरत चालले आहेत.
ऍड अलका शेळके-मोरे पाटील यांनी माहितीच्या अधिकारात टाकलेल्या अपिलात मा गटविकास अधिकारी यांनी अपील धारकास पुढील सुनावणी साठी बोलवले असून त्यात दिनांक आणि वेळ च टाकलेली नाही.जा.क्र/मा. अ/आर आर/८५/२० पत्र दि 3 जाने 2020 रोजी अपील धारकास रवाना करण्यात आले आहे. यामुळे तक्रार दार गोंधळात पडले आहेत या पत्रावर स्वतः गटविकास अधिकारी यांची सही असून आता काय करायचे असा प्रश्न अपिल धारकांना पडला आहे. त्यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी आज दि 15 जाने रोजी या संदर्भात निवेदन देणार असल्याचे व गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.






