Amalner

?️ अमळनेर शहरातील काँटेन्मेंट झोन मधील APL (केसरी) कार्ड धारकांना इथे मिळेल रेशन..तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

?️ अमळनेर शहरातील APL (केसरी) कार्ड धारकांना इथे मिळेल रेशन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

अमळनेर शहरातील APL (केसरी) कार्ड धारकांना कळविणेत येते की, अमळनेर शहरातील घोषीत करणेत आलेल्या कन्टेनमेन्ट झोन मधील स्वस्त धान्य दुकान APL(केसरी) धारकांना धान्य वाटप सुरु करणेत येत असून, सदर दुकानांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

?? स्वस्त धान्य दुकान क्र. धान्य मिळण्याचे ठिकाण

  • 1,2 एन.टी.मुंदडा मराठी शाळा समाज मंदीरा समोर अमळनेर 6,26 फुलमाळी मंगल कार्यालय, अमळनेर
  • 21,23 प्रकाश डेरे यांच्या राहत्या घरी (पवन चौक) अमळनेर
  • 20 वाडी चौकात अमळनेरबडगुजर मंगल कार्यालय, अमळनेर योगेश सीजे यांच्या राहत्या घरी
  • 13,31 उर्दु शाळा क्र.6 अमळनेर
  • 12 नगरपरिषद माध्यमिक विद्यालय अमळनेर

येथे माहे मे चे APL धान्य वाटप होणार असून त्याठिकाणी कोणीही अनावश्यक गर्दी करु नये.

स्वस्त धान्य दुकानदार हे शिधा पत्रिका धारकांना दुरध्वनीद्वारे बोलविणार असून 10-10 च्या
बैंच मध्ये धान्य वितरित करणेत येणार आहे.

धान्य वितरित करतेवेळी सोशियल डिस्टसिंगचा
पूर्ण पणे पालण होणार असल्याने कोणीही अनावश्यक गर्दी करु नये असे आवाहन
तहसिलदार अमळनेर हे करीत आहेत.

?? आवाहन

अमळनेर तालुक्यातील सर्व नागरीकांना कळविणेत येते की, अमळनेर तालुक्यातील वाढत्या करोना रुग्णांबाबत कोणीही घाबरुन जाऊ नये. अमळनेर तालुक्यात सद्यस्थितीत 104 पोझिटीव्ह रुग्ण असले तरी पॉझिटीव्ह रुग्णांचे संपर्कातील सर्व व्यक्तींना व कन्टेनमेन्ट झोन मधील हाय रिस्क व्यक्तींची तपासणी केल्यामुळे संख्या वाढत आहेत. सदर व्यक्तींना
विलगिकरण कक्षामध्ये ठेवणेत आलेले असून त्यांचेवर योग्य ते उपचार सुरु आहेत त्यामुळे ते।
वेळेत बरे होणार आहेत. भविष्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेस प्रशासन व आपण
यशस्वी होऊ.तरी कोणीही घाबरुन जाऊ नये असे आवाहन तहसिलदार अमळनेर हे करीत
आहेत.

अमळनेर तालुक्यातील कन्टेनमेन्ट झोन मध्ये मा. उपविभागीय कार्यालयातील एक टिम व
शिक्षकाची टिम ज्याचे वय 60 वर्षाच्या पुढे आहे व या आधीच आजारपण आहे (शुगर, बी.पी.,
टि.बी. व इतर) अशा व्यक्तींना दुरध्वनीद्वारे रोज पडताळणी करणेत येणार असून त्यांचेवर
लक्ष केंद्रीत करणेत येत आहे. सर्वांनी प्रशासनाला योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वानी घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे. अत्यावश्यक (किराणा, भाजीपाला, दुध)
सेवा सर्वाना घरपोहोच मिळणार आहे. सर्वांनी काळजी घ्या घरातच थांबा, असे आवाहन तहसिलदार मिलिंदकुमार वाघ अमळनेर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button