शिवाजी नाट्यगृहात लायन्स क्लब च्या कार्यक्रमात पत्रकारांचा अपमान??
स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारे “सिंह”(लायन्स )नसून डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरी आहेत….
जाहीर निषेध
प्रा जयश्री साळुंके
अमळनेर येथे तथाकथित सामाजिक संघटना कार्यरत आहेत. या संघटना सामाजिक कार्य करतात असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु सामाजिक काम कोणत्या स्वरूपाचे आहे ?यातून लाखो रु चा फायदा कसा करून घेतला जातो हे सर्वांना माहीत आहे. मांजराला असे वाटते की मी डोळे मिटून दूध पित आहे परंतु परंतु हा त्यांचा भ्रम आहे.
समाजातील तथाकथित उच्च पांढरपेशा लोंकांचा समूह एकत्रित येऊन सामाजिक सेवा करत असल्याचा बुरखा पांघरून कार्य करत असतो. विशेष म्हणजे काही विशिष्ट समाजाचेच याच्या वर प्रभुत्व असते या संघटानंमध्ये रोटरी, रोटरीयान्स,लायन्स लायनेस असे विभाग आहेत.
या संघटना छोटे छोटे कार्यक्रम एखाद्या शाळेत,महाविद्यालयात घेऊन बॅनर लावून फोटो काढतात आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणून वर पाठवून पैसे मिळवितात.
परवा नाट्य गृह येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार बंधू आणि भगिनींना अपमानास्पद वागणूक देत मागच्या खुर्च्यांवर बसविण्यात आले. पत्रकार हा समाजाचा चौथा भक्कम स्तंभ आहे आणि समाजातील चांगले वाईट योग्य अयोग्य मांडण्याचा पत्रकार आपल्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.तो देखील एक सामाजिक कार्य करीत असतो.अश्या समाजचा आरसा असणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींचा अपमान करणे हे योग्य असून समाजात जे स्वतःला ठेकेदार समजत असतील तर त्यांनी वेळीच शुद्धीवर यावे.तुमची अरेरावी आणि विशिष्ट समुदयाप्रति असलेली असहिष्णुता समाज खपवून घेणार नाही. आणि पत्रकार ही खपवून घेणार नाही याची नोंद घ्यावी.
परवा नाट्य गृहात झालेल्या कार्यक्रम झालेला खर्च,नाट्यगृहची पावती,परवानगी वै विषय महत्वाचे आहेत.हा कार्यक्रम किती सामाजिक होता? यातून समाजाचे काय हित साधले गेले?.जमा झालेला तिकिटांचा पैसा कोणावर खर्च केला जाणार आहे? इ विषयांची चर्चा होत आहे.
महाराष्ट्र मराठी 7 च्या संपादक आणि सर्व प्रतिनिधी या संघटनाचा जाहीर निषेध करीत आहे.






