Amalner

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या… पारोळा रोडवरील घटना

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या… पारोळा रोडवरील घटना

अमळनेर तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच असून काल पारोळा रोडवरील युवकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. पदवी घेत असलेल्या व शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर युवक हा पारोळा रोडवरील गुरव कॉलनीत राहत होता.याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मात्र अत्महत्येचे कारण अजून पर्यंत समोर आले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारोळा रोडवरील गुरव कॉलनीत राहणारा शुभम अरुण पारे (वय २१) याने १९ रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी वरच्या मजल्यावर छताच्या लोखंडी कडीला साडी बांधून
गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम हा टीवायबीएत शिकत होता. प्रवीण रमेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर तपास एएसआय पुरुषोत्तम पाटील करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button