? धक्कादायक! शहरात म्युकरमायकोसीसचे 274 रुग्ण
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसीसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरीकडे हा संसर्ग थांबण्यासाठी लागणारे अम्फोटेरेसिनचे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत.
शहरात या आजाराचे 274 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इतरत्र कुठे इंजेक्शन मिळते का याचा शोध घेत आहेत. शनिवारी एक हजार इंजेक्शनची मागणी असताना रुग्णाला एकही इंजेक्शन वाटप करण्यात आले नाही.
याबाबत एफडीएचे अधिकारी राजगोपाल बजाज यांनी सांगितले की, शुक्रवारी 130 इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र शनिवारी इंजेक्शन आलेच नाही त्यामुळे एकही हॉस्पिटलला इंजेक्शन दिले नाही रविवारी देखील इंजेक्शन मिळाले नाही.
*जिल्ह्याला २० हजार इंजेक्शनची प्रतीक्षा* : औरंगाबाद जिल्ह्याने 20 हजार इंजेक्शनची ऑर्डर दिलेली आहे. मात्र अजूनही हे इंजेक्शन आलेले नाहीत. इंजेक्शन केव्हा मिळतील याची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत.






