मिल व कामगारांच्या हितासाठी हिंद कामगार युनियनची स्थापना- घनश्याम नाईक
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : नागरिका स्पिनिंग मिल मध्ये पूर्वीच्या युनियन कडून कामगारांचे प्रश्न सोडवले जात नसल्यामुळे आणि मिल व कामगार असे दोघांच्याही हितासाठीच या मिलमध्ये हिंद कामगार जनरल सेनेच्या युनियन ची स्थापना केल्याचे हिंद कामगार सेनेचे सरचिटणीस घनश्याम सरनाईक यांनी सांगितले ते नागरिका स्पेलिंग मिल येवलुज येथे हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या नाम फलकाचे अनावरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. तसेच मिल मध्ये काम करताना शिस्तबद्ध पद्धतीने व मिलचे उत्पादन जास्तीत जास्त कसे वाढेल याकडे लक्ष देण्याचेही त्यांनी कामगारांना सांगितले. नामफलकाचे उद्घाटन सेनेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पा पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर कार्यक्रमामध्ये अमित वेंगुरलेकर यांची महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी, अपर्णा कोठावळे यांची कोल्हापूर महिला संपर्क प्रमुख, ज्योति नागारे यांची इचलकरंजी महिला तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास यावेळी अध्यक्ष श्री आप्पा पराडकर , सरचिटणीस घनश्याम नाईक,कोल्हापूर सह संपर्क प्रमुख श्री विनायक साळुंखे, चिटणीस अमित वेंगुर्लेकर ,महिला संपर्क प्रमुख अपर्णा कोठावळे, जिल्हा संपर्कप्रमुख विनायक साळोखे, सिंधुदुर्ग उप- शिवसेनाप्रमुख प्रशांत कोठावळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर , राज्य कार्यकारिणी सदस्य अमित वेंगुर्लेकर, इचलकरंजी महिला विभाग प्रमुख ज्योति नागारे, संजय पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष महादेव कुकडे, समीर शेख, भिकाजी बिलुगडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष यासीन मोह्ममद शेख, जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, चिटणीस महेश नंदे , विजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भगवान गुरव, याकुब बक्षू, योगेश पोवार यांच्यासह हिंद कामगार सेनेचे सभासद , नागरिका मिलमधील कामगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .






