Amalner

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आर्डी अनोरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

  डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत  आर्डी अनोरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण 

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आर्डी अनोरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण

प्रतिनिधी अविनाश पवार
लहान मुले देवाघरची फुले . बालवयातच मुलांना पर्यावरणाचे धडे देणे गरजेचे आहे. तसेच बालवयातच वृक्षारोपण कसे करावे , कुठले वृक्ष लावावेत याचे ज्ञान देणे अति आवश्यक झालेय . पर्यावरणाची हीच संपूर्ण जाणीव असलेले गाव म्हणजे आर्डी अनोरे हे गाव . आणि इथल्या गावातील ज़िल्हापरिषदेची हि प्रार्थमिक शाळा जिथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला . सुंदर स्वच्छ नीटनेटकी सुबक असा या शाळेचा उल्लेख करावाच लागेल . लहं मुलाचा सहभाग आणि वृक्षारोपणाचा त्यांचा आनंद कौतुकास्पद होता. कलाम सर यांचे प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमास सुरवात झाली. डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या नासिक विभागाच्या समन्वयक सौ मनीषा चौधरी यांचा सत्कार केला गेला. त्या नंतर सौ मनीषा चौधरी यांचे हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सौ मनीषा चौधरी यांचे हस्ते शाळेच्या मुख्याद्यापक श्री सुरेश पाटील यांचा डॉ ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे सन्मान पात्र देऊन सत्कार करण्यात आला. 

डॉ अब्दुल कलाम सोशल फॉरेस्ट अंतर्गत आर्डी अनोरे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण
या वृक्षारोपण कार्यक्रमास सरपंच सौ कविता विजय वानखेडे , उपसरपंच सौ रंजनाबाई राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच श्री किशोर मुकुंदराव पाटील, ग्रामस्थ श्री विजय भास्कर वानखेडे , ग्रामस्थ श्री राजेंद्र पाटील , मुख्याध्यापक श्री सुरेश पाटील सर , शिक्षिका सौ रेखाबाई सीताराम पाटील , शिक्षक श्री राकेश शिरसाठ , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य समाधान पाटील, रुपेश पाटील, निलेश बाविस्कर, प्रतीक पाटील , निलेश पाटील, निलेश संतोष पाटील, निखिल पाटील, भटू पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button