Chopda

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण २०७पैकी ३२ तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,म.रा.वी. म.,बीएसएनएलच्या दाखलपूर्व २११७ प्रकरणापैकी ६० प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली ६११९४०९ रुपये झाली स्टेट बँकचे वरीष्ठ अधिकाऱ्याचे भरघोस सहकार्य….

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण २०७पैकी ३२ तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,म.रा.वी. म.,बीएसएनएलच्या दाखलपूर्व २११७ प्रकरणापैकी ६० प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली ६११९४०९ रुपये झाली स्टेट बँकचे वरीष्ठ अधिकाऱ्याचे भरघोस सहकार्य….

चोपडा : मा. उच्च न्यायालय मबुई व मा. विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.२५ सप्टेंबर शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण २०७ पैकी ३२ तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,म.रा.वी.म.,बीएसएनएलच्या दाखलपूर्व २११७ प्रकरणापैकी ६० प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली ६११९४०९ रुपये झाले.
सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतला सुरवात झाली यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांच्या समोर पंच म्हणून ऍड.एस.आर. शर्मा ऍड.ए.ए.हुसेन चोपडा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव सचिव ऍड. विलास डी. बाविस्कर, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, ऍड. प्रसाद काबरे, ऍड.एस.एफ.जैन, ऍड.प्रवीण एच.पाटील, ऍड. नितिन चौधरी, ऍड.एस. एम. बारी,ऍड.उमेश बी.पाटील,ऍड. धर्मेंद्र एस.सोनार, ऍड.बी.सी.पाटील, ऍड.ऐ.व्ही.जैन ऍड. एस. डी. सोनवणे, ऍड.अबादास पाटील आदी हजर होते
चोपडा न्यायालयतील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण २०७ ठेवण्यात आले होते त्यातून दिवाणी ४ प्रकरण, फौजदारीचे २ प्रकरणे धनादेश अनादर प्रकरण १७ व पती पत्नीचे वाद अशी एकूण ३२ प्रकरणें निकाली काढण्यात आले यात २० लाख ५२हजार ८२८ रुपये वसूली झाली स्टेट बँक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ बडोदा यांची एकूण ११७१ प्रकरणातून ५५ प्रकरण निकाली झाले यात ४०लाख ५३ हजार३०१ रुपये वसूल करण्यात आले. मराविमडळ शहर ८८९ प्रकरणातून ५ प्रकरण निकाली झाले यात १३२८० रुपये वसूल करण्यात आले बीएसएनएल ५७ प्रकरणातून एकही प्रकरण निकाली झाले नाही एकूण दाखल पूर्व प्रकरणात ४०६६५८१ रुपये वसूल करण्यात आले तर दाखल प्रकरणातून २०लाख ५२ हजार ८२८ रुपये वसूल करण्यात आले एकूण ६१लाख १९ हजार ४०९ रुपये वसूल करण्यात आले या दाखल गुन्ह्यात नवरा – बायकोचे नऊ प्रकरण तडजोड करण्यात आले त्यामुळे अनेक जुने वाद देखील न्यायालयात मिटविण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे . कार्यक्रम यस्वीतेसाठी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यानी व न्यायालय येथील सहा.अधिक्षक डी.जी.चौधरी, वरीष्ठ लिपिक एस.जी.नगरकर, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर डी.एम. महाजन,एन.डी. कुलकर्णी, एम.बी. बाविस्कर, शिपाई प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, दिपक महाजन आदिंनी सहकार्य केले. स्टेट बँकचे वरिष्ठ अधिकारी मुकेशकुमार सिंग, शाखा व्यवस्थापक भूषण रंगारी तसेच इतर बँक व्यवस्थापकांनी उत्तम सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button