Rawer

मायक्रो फायनान्स कंपन्या कडून सक्तीची वसुली थांबवावी

मायक्रो फायनान्स कंपन्या कडून सक्तीची वसुली थांबवावी

खिर्डी खु. प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

सध्या रावेर तालुक्या मध्ये मायक्रो फायनान्स कंपन्या व त्यांचे प्रतिनिधी महीला बचत गटांना तसेच अन्य नागरिकांना कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी जबरदस्ती करीत असतात .आता पर्यंत महीला बचत गटांनी वेळे वर कर्जाचे हप्ते नियमित भरलेले असून . या प्रकाराची सरकारने दखल घेवून महीला बचत व खाजगी व्यवसायिकां ची या जाचातून काही काळा साठी सुटका करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांचे कडे ईमेल द्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे.भारतीय स्टेट बँकेने केंद्र सरकारच्या आदेशनुसार ई एम आय वसुलीला स्थगिती दिली आहे.मात्र खाजगी मायक्रो फायनान्स कंपन्या द्वारे वसुली सुरू आहे. महीला बचत गट सदस्याच्या अशिक्षितपणा चा फायदा घेवून मायक्रो फायनान्स कंपन्यानी .आधार कार्ड रेशन कार्ड या कागद पत्रांच्य आधारे आमिष दाखवून कर्ज वितरण केले.मात्र कोरोना सारख्या वैश्विक महामारी मुळे अनेकांचे रोजगार बुडाल्याने व महिलांना वेळेवर कर्जाचे हफ्ते भरण्या इतपत कुवत राहिलेली नाही.त्यातच महिलांच्या हाताला काम नसल्यामुळे वेतन मिळत नाही.अशा परिस्थितीत खाजगी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे अशक्य झाल्याने कर्ज वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी. सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार भिमराव कोचुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button