Amalner

*कोरोना मुक्त भारत मिशन*

*कोरोना मुक्त भारत मिशन*

हे भाऊ, जरा बघ ना.
जिकडे पाहशील, तिकडे कोरोना..
घराबाहेर जर जाशील
तर कोरोनाग्रस्त होशील ना..
कोरोना तुला डचेल ना
ही दक्षता घे ना..
ही दक्षता घे ना..

अहो दादा, शिस्तीचे पालन
करू या,माणुसकी जपूया
जनता कर्फ्यूला ,प्रतिसाद देऊ या
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. हा नियम पाळा..
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा ना..

अहो माई ,अहो अक्का,
कोरोना न होण्याचा विचार करा पक्का.
देशात हा ‘कर्फ्यू जनतेचा’
म्हणून आपल्या हितासाठी
घरातचं गप्प बसा ना..
कोरोनामुक्त रहा ना..

अहो ताई ,हे कोरोना भीषण संकट’आहे जगावरी.
त्यात आपला भारतही कोरोनाग्रस्त ,ही महामारी
जनता कर्फ्यूने बाधित रुग्णांचे होईल विलगीकरण
हे कोरोनामुक्त भारत मिशन..
हे कोरोनामुक्त भारत मिशन

आज प्रतिबंधात्मक उपाययोजनेत,
आपले भारत सरकार खंबीर,
खंबीर आहे ,महाराष्ट्र शासन.
कोरोनामुक्त होऊ, विषाणूंशी लढा देऊ
कोरोना मुक्त करू, भारत मिशन

*अजय भामरे तथा पत्रकार*-
* *मो.नं ९४२०९००००४*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button