?️अमळनेर कट्टा…कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दीचा उच्चांक तर मच्छी बाजार कोणाच्या आशीर्वादाने सुरू..!प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत..!
अमळनेर येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातुन गर्दी न करण्यासाठी च्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेर नगरपरिषदेचे अधिकारी व्यापारी, पत्रकार यांच्या संमतीने सोमवारी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे ठरले आहे. असे असतांना आज दुसऱ्या सोमवारी शहरात 90%बंद पाळण्यात आला.परंतु प्रशासन मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे.आज कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी जमली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदसिद्ध सभापती..?नी..! नेमकं कोण..? याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.तर इतर प्रशासकीय व राजकीय सदस्यांनी देखील यावर कोणतेही निर्बंध घातले नाहीत.गर्दी आटोक्यात आणण्याचे कोणतेही उपाय करण्यात आले नाहीत.इतर ठिकाणी कार्यवाही करणारे प्रशासन यावेळी झोपले होते का..? छोटे छोटे बँड वाले, छोटे मोठे मंगल कार्यालय,लहान सहान टपरी वाले प्रशासनाच्या नजरेत खुपत असतात.ते योग्य करतात असे नाही पण इतर ही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात आहे याकडे प्रशासन लक्ष देईल का..?
आज संध्याकाळ पर्यंत मच्छी बाजार तितक्याच जोरात आणि गर्दी सह सुरू होता..! याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे का..? कोणाचा वरद हस्त आहे..? या लोकांवर ..? नियम सर्वांना सारखा असला पाहिजे. जर तसे करू शकत नसाल तर सर्वांना च सूट द्या..! एक दिवस बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी गर्दी उसळते त्यावर कस नियंत्रण मिळवता येईल..? यावर वेगळा विचार होणे आवश्यक आहे.






