चांपा/नागपूर

सरपंचाच्या प्रयत्नाला अखेर यश आले . चांपा येथे स्मशानभूमीचे काम सुरू… ७०वर्षांपासूनची मागणी , विविध सोयी होणार

सरपंचाच्या प्रयत्नाला अखेर यश आले . चांपा येथे स्मशानभूमीचे काम सुरू…
७० वर्षांपासूनची मागणी , विविध सोयी होणार 

सरपंचाच्या प्रयत्नाला अखेर यश आले . चांपा येथे स्मशानभूमीचे काम सुरू... ७०वर्षांपासूनची मागणी , विविध सोयी होणार

चांपा प्रतिनिधी अनिल पवार
उमरेड तालुक्यातील चांपा येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थ चांपा -मांगली मार्गांवर उघड्यावरच मृतावर अंत्यसंस्कार करत होते .त्यामुळे चांपा  येथे होत असलेल्या अंत्यसंस्कारावर बंदी घालुन स्मशानभूमी उभारण्याची ग्रामस्थांची ७०वर्षांपासूनची मागणी सरपंच अतिश पवार यांनी पदभार स्वीकारताच स्मशानभूमीची मागणी जिल्हापरिषद प्रशासनाने मान्य करून स्मशानभूमीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात केली.असता स्मशानभूमी ही 
गावातील जटील समस्या असल्याने  वनविभागाच्या अडथळयाने स्मशानभूमीचे बांधकाम थांबले सरपंच अतिश पवार यांनी वेळोवळी शासनाकडे पत्रव्यवहार व कार्यालयाच्या चकरा मारल्याने अखेर प्रयत्नाला यश आले असून स्मशानभूमीचे बांधकामाला सुरवात झाली व आता स्मशानभूमीचे बांधकाम युध्दपातळीवर असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी सांगितले .सकाळने २२ऑक्टोंबर रोजी अखेर रस्त्याच्या कडेला जाळला मृतदेह , स्मशानभूमी अभावी ग्रामस्थांचा प्रशासनावर रोष , आंदोलनाचा इशारा , या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते .त्यानंतर स्मशानभूमीच्या बांधकामाला चालना मिळाली प्रशासनाने जिल्हापरिषद अंतर्गत जनसुविधा बांधकाम फंडातून पाच लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभूमी शेडच्या बांधकामाला सुरवात केली .११ऑक्टोंबर  सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .या स्मशानभूमीचे क्षेत्र २एकर जागेत विस्तारले आहे.मोकळ्या जागेत  पिंपळ , कांचन , आवळा , गुलमोहर , यांसारख्या ३००वृक्षाची लागवड करण्यात आली आहे .येत्या दीड महिन्यात स्मशानभूमीचे बांधकाम पुर्ण होणार असल्याची माहिती सरपंच अतिश पवार यांनी दिली .

सरपंचाच्या प्रयत्नाला अखेर यश आले . चांपा येथे स्मशानभूमीचे काम सुरू... ७०वर्षांपासूनची मागणी , विविध सोयी होणार
-:चांपा येथील ग्रामस्थांची ७०वर्षांपासूनची मागणी  पूर्णत्वास गेली आहे .त्यामुळे उघड्यावर होणारे गावातील अंत्यसंस्कार बंद होणार आहेत .स्मशानभूमीत पाणी , वीज यांसह अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांना बसण्याची बेंचची व्यवस्था करण्यात येणार आहे .स्मशानभूमीची जटील समस्या सोडविण्यास दै . सकाळ वृत्त व शासनाचे खूप आभार मानतो .
*- अतिश पवार , सरपंच चांपा*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button