Amalner

?️ अमळनेर कट्टा… महिलांनो, कोरोनाची मरगळ झटकून छान ‘नटून थटून’ आपल्या गुढीसोबत पाठवा सेल्फी! अमळनेरच्या महिला भगिनींसाठी अंबिका फोटो स्टुडिओतर्फे खास स्पर्धेचे आयोजन

?️ अमळनेर कट्टा… महिलांनो, कोरोनाची मरगळ झटकून छान ‘नटून थटून’ आपल्या गुढीसोबत पाठवा सेल्फी! अमळनेरच्या महिला भगिनींसाठी अंबिका फोटो स्टुडिओतर्फे खास स्पर्धेचे आयोजन

अमळनेर : चैतन्य आणि मांगल्याचे लेण घेऊन आणि निसर्गासोबत नवी पालवी घेऊन येणार्‍या चैत्र गुढीपाडव्याच्या सणाचा गोडवा वाढवा म्हणून अंबिका फोटो स्टुडिओतर्फे अमळनेरच्या महिला भगिनींसाठी खास *सेल्फी गुढी सजावट स्पर्धा* आयोजित करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळातील नैराश्याची मरगळ झटकून महिलांमध्ये नव चैतन्य निर्माण व्हावे म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. १३ एप्रिल रोजी ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा *मोफत* असून विजेत्या महिलांना रोख रकमेसह पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी सुध्दा कोरोनाच्या प्रतिबंध असल्याने गुडीपाडवा हा सण उत्स्फूर्तपणे साजरा करू शकलो नाही. तसेच संपूर्ण वर्ष अतिशय मरगळलेल्या सारखे गेले आहे. म्हणून जेणे करून कोरोनाची मरगळ आणि भीती दूर होऊन महिलांनी छानपैकी नटून थटून आपल्या स्वतः कडे लक्ष द्यावे व आपल्यात उभारी यावी म्हणून *सेल्फी विथ गुढी* ही स्पर्धा आयोजित केली आहे.तरी आपल्या गुढी सोबतचा फोटो व गुढीचे फोटो….७०२०९०६७४६ या नंबर वर पाठवावेत.

*यासाठी विजेत्यांना*
*पहिले बक्षीस* :- ७०१ रुपये,
*दुसरे बक्षीस* ५०१ रुपये,
*तिसरे बक्षीस* ३०१ रुपये
आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
यासाठी स्पर्धकांनी आपल्या मोबाईलवर काढलेले फोटो दिलेल्या नंबर वर पाठवावा. एक स्वतंत्र फोटो गुढीचा असावा व एक सेल्फी गुढीसोबत असावी. तर विजेत्या स्पर्धकांचे नाव १८ तारीख रविवारी घोषित करण्यात येईल व बक्षीस त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ऑनलाईन गुगल पे किंवा फोन पे ने टाकण्यात येणार आहे.
*उत्कृष्ट सेल्फी व गुढी फोटोची निवड व बक्षीस अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे व अमळनेर नपाच्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड मॅडम* घोषित करणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी असे आवाहन करण्यात आले आहे.
*टीप* :- सदरची स्पर्धा फक्त मुली व महिलांकरीताचं आहे स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button