उपोषणाचा ईशारा दिल्या नंतर झोपलेले शासन झाले जागे
धार ता अमळनेर येथील ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार उघडकीस
अमळनेर : तालुक्यातील धार या गावात माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सध्याचे उपसरपंच शशिकांत बोरसे यांनी सांगितले आहे . या बाबत बोरसे यांनी गट विकास अधिकारी अमळनेर पंचायत समिती यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. व दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देखील दिला होता.
या पार्श्वभूमीवर आज माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी ते तार कंपाउंड काढून जाडीचे कंपाऊंड करण्याचे काम सुरू केले आहे. म्हणून या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या गावाला न्याय मिळवून न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान या बाबत धार गावाचे उपसरपंच शशिकांत बोरसे यांच्या सह बहुसंख्य गावकरी 26 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत. म्हणून प्रशासन यावर काय पवित्रा घेते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.






