Aurangabad

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करण्यात यावे; तसेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करण्यात यावे; तसेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.

औरंगाबाद :- गणेश ढेंबरे.

संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले असुन त्याची झळ वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदार संघात देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कापुस, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तुर, मुग, ऊस, कांदा, फळबागा आदी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड अर्थीक नुकसान झाले. हाताशी आलेले पिक निघून जाण्याची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनामे करण्यासाठी संबंधित विमा प्रतिनिधी, महसूल यत्रंना, कृषी विभाग यांना आदेश द्यावे.

शेतकर्यांना त्वरीत हेक्टरी ५० हजार रुपयांचे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी तसेच शेतकर्यांनी भरलेल्या पिकविम्याची रक्कम मिळण्यासाठी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधी नी नुकसानीची तीव्रता लक्षात घेता पिक विमा मंजूर करण्याचे आदेश द्यावे. जेणेकरून शेतकर्यांना आर्थीक अडचणीतून सावरण्यास मदत होईल या विषयी निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार भाऊसाहेब( तात्या) पाटील चिकटगावकर , जिल्हा कार्याध्यक्ष अभय दादा पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अॅड. प्रतापराव निबांळकर साहेब, पंचायत समिती उपसभापती राजेंद्र नाना मगर, तालुका कार्याध्यक्ष उत्तम काका निकम, शहर अध्यक्ष प्रेमभाऊ राजपुत, खरेदी विक्री संघाचे संचालक मंजाहारी पाटील गाढे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले, रवींद्र पाटणे, संदिप पवार, बाळुपाटील शेळके
, सागर भाऊ गायकवाड, बापु साळुंखे, अॅड. प्रदीप चंदने, विश्वात्मक कुहिले, शरद बोरणारे, प्रशांत शिंदे, राहुल साळुंके, दादाभाऊ गायकवाड, अविनाश रोकडे, शैलेश निखाडे, सम्राट राजपुत, यांची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button