जपान जिन मध्ये 26 गुरांची कत्तल होण्यापासून रोखली..पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची उत्कृष्ट कामगिरी..
आज दि.20/07/2021 रोजी सकाळी 04.00 वा.च्या सुमारास मा.पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांनी मला तसेच पोउपनि श्री राहुल लबडे, सफौ/2167 संजय पाटील, पोहेकॉ/449 किशोर पाटील, पोहेकॉ/1605 सुनिल पाटील, पोहेकॉ/865 संजय पाटील, पोना/422 शरद पाटील, पोना/1970 कैलास शिंदे, पोना/1790 हितेश चिंचोरे, मपोना/2388 रेखा ईशी, पोकॉ/1344 सुर्यकांत साळुखे, पोकॉ/3331 रविंद्र पाटील व शासकीय वाहन चालक पोकॉ/3260 सुनिल पाटील व पंचनाम्यातील नमुद पंचाना अमळनेर मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार अमळनेर शहरातील जापान जिन भागातील सुरत – भुसावळ रेल्वे लाईनचे लगत असलेल्या सलीम अहेमद सुलेमान कुरेशी रा. जापान जिन हे त्याचे मालकिचे शेत गट नं. 48 मध्ये स्वताचे फायद्याकरीता गैरकायदा गुराचा कत्तल खाना चालवुन दिनाक 21/07/2021 रोजी साजरे होणारे बकरी ईदचे अनुषंगाने गोवंश हत्येस बंदी असतानां गोवंशचे सशक्त गोरे (गायीचे वासरु ) बैल असे कत्तलीकरीता खरेदी करुन त्याचे कत्तलखान्यासमोर बांधुन ठेवलेली आहे तरी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन छापा सकाळी 05.10 वा कारवाई करण्यात आली आहे.
येथे सलीम अहेमद सुलेमान कुरेशी याचे शेत गट नं. 48 मधिल सुरत – भुसावळ रेल्वे लाईनचे लगत असलेल्या अवैध गुराचे कत्तलखान्या समोर गोवंश त्यात अंदाजे 3 ते 6 वर्षे वयाचे सशक्त गो-हं असे गैरवाजवी पणे बांधुन त्यानां पुरेसे अन्न , पाणी नसलेले, त्याचे पोट भुकेने खोलगट होवुन व्याकुळलेले दिसुन आले सदर ठिकाणी एक इसम व ईतर नागरीक हजर झाले. त्यातील एका इसमाने आमचे समक्ष येवुन त्याने त्याचे नाव सलीम अहेमद सुलेमान कुरेशी वय 55 रा. जापान जिन , अमळनेर येथे स्व मालकीचा कत्तलखाना गो-हे व बैल हे मी व माझे सहकारी हसनखाँ गुलाबखाँ कुरेशी रा. जापान जिन अशानी खरेदी करुन तचे आमचे दोघाचे मालकिचे आहेत.गुराच्या कत्तल खान्याचा परवाना नसताना कत्तल करीता कत्तल खान्यासमोर बांधुन ठेवलेले खालील नमुद वर्णानाचे गोवंश असलेले गो-हे (वळु) व बैल
मिळुन आलेत ते खालील प्रमाणे
1) 7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , लाल-भुरा रंगाचा गळ्यात हिरवी दोरी बांधलेली 06 वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
2)7000-00 रुपये किमतीचा भुरकट रंगाचा सहा वर्षे वयाचा 4 दाती सशक्त असलेला गो-हा.
3) 6000-00 रुपये किमतीचा एक ठेलारी जातीचा , लाल रंगाचा , पाच वर्षे वयाचा 4 दाती सशक्त असलेला गो-हा.
4) 10,000-00 रुपये किमतीचा एक लेंडी जातीचा , लाल रंगाचा एक डोळा अधु असलेला , 07 वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
5) 7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , पांढरे रंगाचा, 06वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
6) 7000-00 रुपये किमतीचा एक जर्शी जातीचा , पांढरे रंगाचा, 06वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
7) 6000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , लाल रंगाचा, 05 वर्षे वयाचा 02 दाती सशक्त असलेला गो-हा.
8) 4000-00 रुपये किमतीचा एक नागोरी जातीचा, काळे रंगाचा, 01 वर्षे वयाचा 02 दाती सशक्त असलेला गो-हा.
9) 5,000-00 रुपये किमतीचा एक जर्शी जातीचा , लाल रंगाचा, 03वर्षे वयाचा 02 दाती सशक्त असलेला गो-हा.
10)5,000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , पांढरे रंगाचा, 05 वर्षे वयाचा 02 दाती सशक्त असलेला गो-हा.
11)10,000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , लाल रंगाचा, 07वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
12)10,000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , भुरकट लाल रंगाचा, 09 वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
13)7000-00 रुपये किमंतीचा एक गावठी जातीचा , भुरकट रंगाचा, 05 वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
14)7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा ; पांढरे रंगाचा, 06वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
15)7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , भुरकट रंगाचा, 05 वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
16)8 000-00 रुपये किमतीचा एक जर्शी जातीचा , 08 वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
17)8 000-00 रुपये किमतीचा एक जर्शी जातीचा , लाल रंगाचा, 08 वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
18)25000-00 रुपये किमतीचा एक लेंढी जातीचा , लाल रंगाचा, 16वर्षे वयाचा पुर्ण दाती सशक्त असलेला बैल
19)8000-00 रुपये किमंतीचा एक गावठी जातीचा , लाल रंगाचा, 08वर्षे वयाचा 06 दाती सशक्त असलेला गो-हा.
20)20000-00 रुपये किमतीचा एक नागोरी जातीचा , पांढरा काळा रंगाचा,उभे शिंगांचा, 12 वर्षे वयाचा 10 दाती सशक्त असलेला बैल
21)7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा, काळ्या रंगाचा, 06वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
22)8000-00 रुपये किमतीचा एक लेंडी जातीचा , काळ्या रंगाचा,गळ्यात लाल रंगाचा पट्टा असलेला, 07 वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
23)7000-00 रुपये किमंतीचा एक लेंडी जातीचा , लाल रंगाचा, 05वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
24)7000-00 रुपये किमतीचा एक गावठी जातीचा , काळ्या रंगाचा, 05वर्षे वयाचा 04 दाती सशक्त असलेला गो-हा.
25)20000-00 रुपये किमंतीचा एक ठेल्लारी जातीचा , पांढरे रंगाचा, 10वर्षे वयाचा पुर्ण दात असलेला बैल.त्याचे उजवे पायावर जखम असलेला.
26)20000-00 रुपये किमतीचा एक ठेल्लारी जातीचा , पांढरे रंगाचा, 10वर्षे वयाचा पुर्ण दात असलेला सशक्त बैल.
एकुण 2,43,000/- रु.किंमतीचे 26 गोवंश असलेले सशक्त गो-हे व बैल
येणे प्रमाणे वरील नमुद वर्णनाचे किंमतीचे गोवंश असलेले सशक्त गो-हे व बैल हे
1)हसनखाँ गुलाब खाँ कुरेशी 2) सलीम अहेमद सुलेमान कुरेशी दोन्ही रा. जापान जिन , अमळनेर यांनी
संगनमत करुन दि.21/07/2021 रोजी मुस्लीम धर्मीयांची साजरी होणारी ईद निमित्त त्यांच्या मालकीचे गुरांच्या कत्तल खान्यासमोर गैरवाजवी पणे बांधुन त्यानां पुरेसे अन्न , पाणी नसलेले, त्याचे पोट भुकेने खोलगट होवुन व्याकुळलेले असे कत्तली करीता खरेदी करून कब्जात बाळगतांना वरील नमुद गोवंश
असलेले 26 गो-हे व बैल किंमत 243000/-रुपयांचे मिळुन आले वरुन सदरचे प्राणी हे गोशाळेत दाखल करणे कामी ताब्यात घेण्यात आले असुन तसा सविस्तर पंचनामा मा.पोनि श्री जयपाल हिरे सो.यांनी
पंचासमक्ष जागीच केला असुन आरोपी 1)हसनखाँ गुलाब खाँ कुरेशी 2)सलीम अहेमद सुलेमान कुरेशी दोन्ही रा. जापान जिन , अमळनेर यांच्या विरुध्द महाराषट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सन 2015 पर्यत सुधारणेसह) कलम 5,5(ब),9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (एफ),(एच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






