रणजीतदादांनी गोकूळची फलंदाजी करावी – सुनिल कांबळे मडिलगे बुद्रुक येथे क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात केले प्रतिपादन ५१ हजार रोख व के.पी.पाटील चषक मुरगुुडच्या सानिका संघाने जिंकला
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : केडीसी बँकेचे विद्यमान संचालक रणजीतदादा पाटील गोकूळ दूध संघाच्या आगामी निवडणूकीत भक्कम फलंदाजी करतील. तसेच टीम के पी पॅटर्न यशस्वी ठरेल असा विश्वास बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक सुनिलराव कांबळे यांनी व्यक्त केला.
मडिलगे बुद्रुक ता.भुदरगड येथे “के.पी.पाटील चषक” टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
माजी आमदार के.पी.पाटील समर्थक सुनिलराव कांबळे क्रिकेटप्रेमी ग्रुपच्या वतीने या स्पर्धेचे संयोजन केले होते. या क्रिकेट स्पर्धेत मुरगूडच्या सानिका संघाने प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रोख रक्कम व चषक जिंकला तर चुये ता करवीरचा संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक मडिलगेे बुद्रू्कच्या आर. आर. संघास तर चतुर्थ वारणा कोडोली यांनी मिळविला .
यावेळी माजी आमदार बिद्रीचे चेअरमन के.पी. पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक प्रदान करणेत आला.
यावेळी केडीसी बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, प्रा.एच.आर. पाटील,संग्राम सिंह देसाई, पंडित बिरंबोळे, संजय आडके, सुनील सोनार यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामपंचायत सरपंच, आजी माजी सदस्य, पदाधिकारी,क्रीडा रसिक, ग्रामस्थ उपस्थित होते. जयवंत बिरंबोळे,नामदेव शिंदे, संतोष कोळी, यांनी संयोजन केले. तसेच समालोचक म्हणून मारुती घाटगे यांनी काम पाहिले.
मडिलगे बुद्रुक येथे पार पडलेल्या “के.पी.पाटील चषक” क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना माजी आमदार के.पी.पाटील,रणजीतसिंह पाटील, सुनिल कांबळे, प्रा एच आर पाटील, संग्रामसिंह देसाई सानिका टीमचे खेळाडू. आदी.






