नगरपरिषदेची पाईप लाइन वाहून गेली???
ढिसाळ कारभाराचा आणखी एक नमुना….लाखो लिटर पाणी वाया…
संबंधित विभागाचा वेळ काढू पणा नागरिकांना त्रास दायक ठरणार…..
अमळनेर
पाणी पुरवठा चार दिवस उशिराने
तामसवाडी धरणाचे 15 दरवाजे उघडल्याने बोरी नदीला पूर आला होता या पुरात मुंदडा नगर व लक्ष्मीनगर या भागातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी टाकलेली 300 मिमी ची पाईप लाईन फुटलेली आहे आणि पाणी प्रवाह अद्यापही सुरू असल्याने नेमका दोष कोठे हे समजू शकत नाही त्यामुळे या पाण्याच्या टाक्यांवरून शहराच्या ज्या भागाला पाणी पुरवठा केला जात आहे यो तीन ते चार दिवस उशिराने होईल नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने यांनी केले आहे.
सदर आज वीस लक्ष (20,00000) पाणी वाया गेलेले असून संबंधित जोडारी यांना टेकडीवर पाहणी करण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही.काय करेल एकटा बिचारा कुठं कुठं लक्ष देईल.पण मात्र इतर ठिकाणी जाण्यासाठी त्यांना फुरसत असते.मग आज कसा वेळ मिळाला नाही.प्रशासनाचा दबाव नसून अजिबात शिस्त आणि कामांची प्राधान्यता नाही.
नवीन पाईप लाईन कोठे लिकीज झाली आहे हे शोधण्यास जोडारी अद्यापही असमर्थ.
सकाळी 4:30 पासून ते रात्री 9:30 पर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले.. आज नगरपरिषदेचे एवढे आर्थिक नुकसान झाले यास जबाबदार कोण.आज 17 तास पंपिंग सुरू होती.








