Nandurbar

सामाजिक तेढ निर्माण होईल यासाठी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून पडताळणी – ईदए मिलादचे दिवशी चित्रीत झाला असल्याचे निष्पन्न

सामाजिक तेढ निर्माण होईल यासाठी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या व्हीडीओ क्लीपची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून पडताळणी – ईदए मिलादचे दिवशी चित्रीत झाला असल्याचे निष्पन्न.

नंदुरबार फहिम शेख

नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर असलेल्या लव नंदुरबार या नावाचे फलकासमोर एक युवक हिरव्या रंगाचा झेंडा फिरवित असल्याची व्हिडीओ क्लिप ही भारत पाकीस्तान क्रिकेट मॅचचे दिवशी चित्रीत झाली असल्याच्या अफवेसह मागील काही दिवसांपासुन समाज माध्यमांवर प्रसारीत झाली होती.
नंदुरबार शहर हे संवेदनशिल शहर असुन सदर व्हिडीओमुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सदरचा व्हिडीओ चित्रीत करणा-या इसमाचा शोध घेऊन त्याचेकडे सखोल चौकशी करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना आदेशीत केले. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी पथकामार्फत सदर इसमाचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव तेली अमन आशिक हुसेन वय ३१ वर्ष रा. गाझी नगर, नंदुरबार असे असुन त्यास स्थानिक गुन्हे शाखेत आणुन त्याचे मोबाईलची तांत्रीक तपासणी केली. त्यात सदर तरुणाने ईद ए मिलादचे दिवशी दिनांक १८/१०/२०२१ रोजी रात्री ११.०८ वाजता हिरव्या रंगाचा इस्लाम धर्माचा झेंडा फिरवितांना सदर व्हिडीओ चित्रीत केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर व्हिडीओ चित्रीत करण्यामागे त्याचा कोणताही गैरहेतु नसल्याचे समोर आले आहे. सदर व्हिडीओचा भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सदर व्हिडिओ भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी संबंधीत असल्याची अफवा असामाजिक तत्वांकडून सामाजिक तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने प्रसारीत करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा न बिघडविता शांतता ठेवावी. तसेच कोणी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करीत असेल तर त्याचेवर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असे आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button