श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन (6 जानेवारी ) रोजी खेड तालुक्यातील किल्ले वाफगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .भूषण सिंह राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी पारंपारिक गजढोल ,तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे, काठी चालवणे, अशा मर्दानी खेळासह मिरवणूक काढण्यात आली. होळकर कालीन मंदिर राजराजेश्वर मध्ये पूजा, गड पूजन ,ध्वजारोहन, होळकर राजघराण्यातील श्रीमंत भूषण सिंह होळकर व वाफगावातील शहीद जवान शिंदे यांच्या कुटुंबाच्या हस्ते राज्याभिषेक झाला.
सरदार घराण्यांच्या उपस्थित तळी भंडार व अभिवादन करण्यात आले तसेच सर्व सरदार घराण्यातील वंशजांचा व सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला . गड-किल्ल्यांच्या वास्तूप्रमाणे या वास्तूचे जतन करणे आवश्यक असून यासाठी सर्वांनी पुढे यावे ,असे आवाहन यावेळी करण्यात आले . होळकर वंशातील राजाने इंग्रजांना हद्दपार करण्यासाठी व त्यांचा धोका ओळखून संपूर्ण देशाला संघटित करत भारत भूमीच्या संरक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, त्या श्रीमंत यशवंतराव होळकर ( प्रथम )यांना अभिवादन करण्यासाठी किल्ले वाफगाव येथे राज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आडवे आप्पा महाराज, अवधूत सिद्ध महाराज, खेलोबा वाघमोडे ,सोमलिंग महाराज, पमुदेव हजारे यांच्यासह माजी आ. रामहरी रुपनवर,मा.जि.प अध्यक्ष विश्वास देवकाते , हरिभाऊ भदे, गणेश हाके, रामराव वडकुते ,दिलीप माने,उज्वला हाके , सुरेश महानवर, सुमित लोखंडे प्रशांत लवटे राहुल गोरे श्रीकांत हंडाळ अशोक थिटे पांडुरंग मारकड धनाजी पारेकर आबासाहेब राखुंडे मनोज मोरे नानासाहेब खरात अॅड अनिल पारेकर शिरिष वाघमोडे रेवण गव्हाणे गोरख रांखुडे आदीसह विदर्भ मराठवाडा कोकणसाह इंदापूर व दौंड तालुक्यातील अनेक बंधू भगिनी उपस्थित होते






