जळगाव येथे फूड सेफ्टी सुपरवायझर व COVID-19 ट्रेनिंग व सर्टिफिकेट योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी – एरंडोल रजनीकांत पाटील
जळगाव येथे फास्टट्रॅक व covid-19 ट्रेनिंग व सर्टिफिकेट या योजनेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला खाद्य पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांना व उत्पादकांना अन्नसुरक्षेसाठी नोंदणी करणे शासन निर्णयानुसार गरजेचे आहे केंद्र शासनाने 25 एप्रिल 2018 रोजी खाद्य विकणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी अन्न सुरक्षिततेसाठी व स्वच्छतेसाठी फुड ट्रेनिंग प्रोग्राम अमलात आणलेला आहे या योजनेची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
सदर प्रशिक्षण हे व्यापाऱ्यांना देऊन कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगांना आळा व बचाव करण्याकरता महत्त्वाचे आहे या योजनेअंतर्गत छोटे व मोठे व्यापारी किराणा दुकानदार , दूध व्यवसाय, हॉटेल, पाणीपुरी, पाव भाजी, अंडा , व मास विक्री करणारे फळ भाजीविक्रेते, बेकरी, रसवंती, चहा दुकान, रेस्टॉरंट, घरगुती मेस, चिकी, ड्रायफ्रूट्स इत्यादी व्यापारी मोठे व्यवसायिक शुगर मिल, फाईल राईस मिल, कोल्ड स्टोरेज, गृह उद्योग, पापड, लोणचे, मसाले, चीप, शेव चिवडा, लहान मुलांचे खाद्य तयार करणारे, मिनरल वॉटर प्लांट, इत्यादी व्यवसायांची यादी जाहीर केलेली आहे.
या व्यवसायिकांना अन्नसुरक्षेसाठी प्रशिक्षण व नोंदणी करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकृत कार्यालयाची नेमणूक केली आहे कार्यालयाचा पत्ता शॉप नंबर 142 डी विंग ग्राउंड फ्लोअर नवीन डीजे मार्केट जळगाव त्याला असा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिर व सर्वे प्रतिनिधी करीत आहे त्यांच्याकडे व्यापाऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जळगाव कार्यालयाचे संचालक प्रमोद पोहेकर व मुख्य प्रबंधक विनायक सोनार व राकेश पवार यांनी केले आहे.






