उच्च शिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था सोलापूर या संस्थेच्या सभासदांची स्वेरीमध्ये बैठक संपन्न.
पंढरपूर- रफिक अतार
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उच्च शिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था सोलापूर या संस्थेच्या सभासदांची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी उच्च शिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था सोलापूर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील या होत्या. या बैठकीमध्ये उच्च शिक्षणातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये विनाअनुदानित बी.सी.ए, बी.बी.एस., बी.बी.ए..या शैक्षणिक अभ्यासक्रमातील एनटी,व ओबीसी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात प्रयत्न करावेत. असे ठरले. तसेच वेतनेतर अनुदान, शिक्षक भरती, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन या विषयावर चर्चा होऊन शासनाकडे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ठरले आहे. तसेच पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठातील शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नाही. ते मिळणे कामी पाठपुरावा करण्यात यावा. हे देखील बैठकीत ठरले. अशी माहिती उच्च शिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्थेचे सचिव प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी दिली. या बैठकीत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, प्राचार्य डॉ.चंद्रकांत कोळेकर, प्राचार्य डॉ.मधुकर बचुटे, गरड शिक्षण संस्थेचे शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
छायाचित्र- स्वेरीमध्ये उच्च शिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था सोलापूर या संस्थेच्या सभासदांची बैठक संपन्न. झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील यांचे स्वेरीतर्फे स्वागत करताना करताना डॉ. दीप्ती तंबोळी व डॉ. मिनाक्षी पवार सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे स्वेरीचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, डॉ. कोळेकर, शिंदे, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, प्राचार्य डॉ. जयप्रकाश बिले, माजी अध्यक्ष डी. एस. सालविठ्ठल, संस्थापक जेष्ठ विश्वस्त दादासाहे रोंगे आदी.




