Aurangabad

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 52 ग्राहकांसह तीन हॉटेल्सवर पोलीसांची कारवाई

लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 52 ग्राहकांसह तीन हॉटेल्सवर पोलीसांची कारवाई

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. ज्यात हॉटेल्सला सायंकाळी चार वाजेनंतर केवळ पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. मात्र वाळूज परिसरातील हॉटेल्स चालक नियम पायदळी तुडवत हॉटेल चालवत होते.

वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाळूज येथील तीन हॉटेल्सवर कारवाई करून यात तब्बल 52 ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूजमधील कंदील हॉटेल, मोरया हॉटेल व वसंत बार अशी कारवाई झालेल्या हॉटेल्सची नावे आहेत. हॉटेल कंदील येथून 22, मोरया येथून 12 तर वसंत बार मधील 12 ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.

या तिन्ही हॉटेल्स कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंधांचे उल्लंघन करत सुरू होत्या. यात ग्राहक बसून जेवण करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी ही कारवाई केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button