माजी आमदार स्मिता वाघ यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कपिलेश्वर महादेव मंदिरावर करण्यात आले हवन…
अमळनेर :- काल दि. 30 रोजी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे कोरोना सारख्या वैश्विक महामारीपासून संपूर्ण जगाचे रक्षण व्हावे तसेच कोरोना सारख्या संकटासमोर लढतांना कोरोना संसर्ग पासून बाधित झालेल्या नेत्या माजी आमदार स्मिताताई वाघ यांची प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे रुद्रयाग विधी करण्यात आला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पराग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे उपस्थित होते. यावेळी सुनील मांडे गुरुजी व सारंग पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनात रुद्रयाग विधी संपन्न झाला.






