?️ अमळनेर कट्टा… वसीम रिजवी विरोधात अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल भादवी २९५ व आय टी अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करा… मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन व हजरत बाबा ताज फाऊंडेशन अमळनेर
अमळनेर : सैयद वसीम रिजवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ बोर्ड, उत्तर प्रदेश, लखनौ यांनी सर्वोच्च न्यायालयात पवित्र कुराणातील २६ श्लोक वगळण्यासाठी जनहित याचिका दाखल केली सदर जनहित याचिका न्यायप्रविष्ट असल्याने त्याचे उत्तर आम्ही न्यायालयात देऊ परंतु वसीम रिजवी हे न्यायालयीन सादर प्रकरणाची माहिती बाहेर इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व प्रिंट मीडिया यांना प्रसारित करून प्रसिद्ध करून ते आमच्या इस्लाम धर्माची बदनामी करीत आहेत. तसेच दोन समाजात हिंदू व मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करून वेगवेगळ्या गटात खास करून शीया, सुनीं,बोहरा, देवबंदी ,बरेलवी, अहेले हदीस व इतर गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करीत आहेत.भारत देशातच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांच्या भावना त्यामुळे दुखावल्या आहेत.
वसीम रिजवी यांच्या वक्तव्यामुळे जगात भारत देशाची प्रतिमा डागळत आहे त्यामुळे देशात अराजकता पसरवण्याचे हे षड्यंत्र असल्याने सय्यद वसीम रिजवी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ,२९५, व आय टी अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा आशयाची लेखी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला रियाजोदीन रूकनोदीन शेख यांनी १६ मार्च २१,मंगळवार रोजी अमळनेर पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक डी. पी. भागवत साहेब यांना प्रत्यक्ष भेटून समक्ष लिहून दिलेली आहे सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. यावेळी अँड शकिल काझी, अँड हाजी साजिद शेख (बाबा) अँड अमजद खान,अँड सलमान, अँड अशफाक सैय्यद, फयाज शेख सह आदि उपस्थित होते







