Mumbai

आखाडा विधानसभेचा …… राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत; बच्चू कडू, राजू शेट्टी व जयंत पाटील लढणार एकत्रित…


आखाडा विधानसभेचा ……
राज्यात  तिसऱ्या  आघाडीचे संकेत; बच्चू कडू, राजू शेट्टी व जयंत पाटील लढणार एकत्रित…

आखाडा विधानसभेचा ...... राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत; बच्चू कडू, राजू शेट्टी व जयंत पाटील लढणार एकत्रित...


मुंबई | विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी व भाजप शिवसेना या पक्षाला शह देण्यासाठी व लोकां समोर तिसरा पर्याय म्हणून एक तिसरी आघाडी तयार झाली असून ही तिसरी आघाडी मिळून विधानसभा निवडणुकीत ताकतीने लढणार असल्याची माहिती आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार बच्चू कडू, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजु शेट्टी व आमदार जयंत पाटील यांनी मिळून तिसरी आघाडी करून निवडणूक लढवण्यासाठी गुरुवारी मुंबईत शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात भेटले.
महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार करून महाराष्ट्रातील इतर लहान राजकीय पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवण्याचे ठरवण्यात आले आहे. सध्या भाजप सरकार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मजबूत आहे तर त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादीची आता काही ताकत उरली नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे भाजप पक्षाला नाराज गट आता तिसऱ्या आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बच्चू कडू यांचे प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यात ताकत आहे. तर राजू शेट्टी यांचे देखील पश्चिम महाराष्ट्र व काही प्रमाणात विदर्भात देखील ताकत आहे.
त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रमुख पक्षाला शह देण्यासाठी ती तिसरी आघाडी मोठ्या प्रमाणावर निवडणूकीसाठी सज्ज झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button