अमळनेर तालुक्यात आढळले नऊ कोरोनाबाधित… २४ संशयितांचे अहवाल आले निगेटीव्ह…
रजनीकांत पाटील
अमळनेर :- तालुक्यात आज दि. २३ रोजी ९ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील रुग्ण संख्या ६१२ झाली आहे.
या रुग्णात कलागुरू ड्रीम सिटी येथील एक, अंतुर्ली येथील एक, भालेराव नगर येथील एक, गांधली येथील एक, सुभाष चौकातील एक, न्यू प्लॉट भागातील एक, जानवे येथील एक, डांगरी येथील एक, दहीवद येथील एक यांचा समावेश आहे. तसेच २४ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ६१२ झाली असून त्यापैकी ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत व ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.






