Pune

पोलिसांनी एल्गार परिषदेस परवानगी नाकारली.

पोलिसांनी एल्गार परिषदेस परवानगी नाकारली.

दत्ता पारेकर पुणे

पुणे : पुणे येथे ३१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार नाही असं वाटत होतं. मात्र त्याचवेळी ही परिषद होईल अशी घोषणा करण्यात आली होती. तसंच आयोजकांनी यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगीही मागितली होती. मात्र, पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. दोन वर्षांपूर्वी एल्गार परिषद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button