संघटित विद्यार्थी कृती समीतीची शैक्षणिक सत्र 2019-20 ची मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती व स्वाधार योजने अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती तात्काळ प्रदान करण्याची समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे ह्याच्याकडे मागणी
प्रतिनिधी/अकोला विलास धोंगडे
कोरोना महामारीच्या आजारामुळे संपुर्ण देशासह राज्यामध्ये सुद्धा अत्यन्त संकटमय परिस्थिती निर्माण झाली आहे.आणि ह्या सर्व परिस्थिती ला सामोरे जाण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र लॉक डाउन असल्यामुळे कुणालाही घराबाहेर जाता येत नाही आहे.परंतु अशा संकटमय परिस्थिती मुळे प्रत्येकावर आर्थिक संकट येऊन पडले आहे.व त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील असंख्य विद्यार्थी सुद्धा ह्या संकटाला सामोरे जात आहेत. परंतु नुकताच शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार असून पुढील प्रवेशासाठी आपली शैक्षणिक शुल्क ही दिली गेलेली असावी करीता.महाविद्यालयीन सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शिष्यवृत्ती मुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश -प्रक्रियेसाठी अडचणी निर्माण होऊ नये ह्या अनुषंगाने लवकरात लवकर मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्ती प्रदान करण्यात यावी व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी स्वाधार शिष्यवृत्ती योजना मध्ये पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च हा स्वाधार शिष्यवृत्ती वर अवलंबुन असतो.तरी अशा सर्वच विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक सत्राचे शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत मिळाली नसल्यामुळे त्यांना सुद्धा सद्यस्थितीत ह्या आर्थिक संकटाला सामोरे जाऊन शैक्षणिक मागील वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची परतफेड करण्याकरिता कर्जबाजारी व्हावे लागत आहे.तरी आता अशा परिस्थिती मध्ये सुद्धा असंख्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व पालकांना सुद्धा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे, सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक भवितव्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या सत्र २०१९-२० च्या स्वाधार योजनेच्या व सर्वच प्रकारच्या शिष्यवृत्ती तात्काळ प्रदान करण्यात याव्या अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद,अकोला चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे व विद्यार्थी नेते अमोल सिरसाट ह्यांनी धनंजय मुंडे ह्यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून केली आहे.






