Amalner

?️अमळनेर कट्टा…लोकेस्ना तोंडमा थूक नही,आमदारना वाढदिवस धूमधडाकामा!एका शेतकऱ्याने मांडली व्यथा…

?️अमळनेर कट्टा…लोकेस्ना तोंडमा थूक नही,आमदारना वाढदिवस धूमधडाकामा!श्याम सोनवणे ह्या शेतकऱ्याने मांडली व्यथा…

  • कोरोना नियमांचे उल्लंघन..
  • दुष्काळग्रस्त परिस्थिती असतांना वाढदिवसाचा धुमधडका…
  • 32 गावांचा अतिवृष्टी चा प्रश्न प्रलंबित..आमदार झोपेत..
  • शहरात फलकांचे स्तोम…
  • गरजू व्यक्तींना होऊ शकली असती मदत..
  • आमदारांचा वाढदिवस जोमात स्वतःला निस्पृह समजणारे प्रशासन कोमात..
  • सामान्य जनतेला दंड ठोठावणारे प्रशासन व्हायरल झालेल्या गर्दीच्या फोटो व्हिडिओ च्या आधारे दंडात्मक कार्यवाही करेल का?….

अमळनेर उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यावर कोरड्या दुष्काळाचे गडद सावट असताना लोकप्रतिनिधींकडून वाढदिवस वा तत्सम सोहळ्यांवर केली जाणारी उधळपट्टी हा वादाचा विषय ठरूनही त्याची तमा संबंधितांकडून बाळगली जात नसल्याचा आणखी एक प्रकार पुढे आला आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी हा पराक्रम केला आहे. या महोदयांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मतदारसंघ शुभेच्छा फलकांनी ओतप्रोत भरेल याची पुरेपूर दक्षता घेतलीच, शिवाय अतिशय उत्सवी स्वरूपात हा सोहळा साजरा होईल याचीही तजवीज केली. कोणतीही चाड न बाळगता साजऱ्या झालेल्या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कान टोचले असतानाही व करोना महामारीचे सावट कायम असतानाही सर्व नियम डावलत या
पक्षाचे पदाधिकारीही तितक्याच उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी वरूणाची कृपा झालेली नाही. कोरड्या दुष्काळाचे गडद सावट असून शेतीनिर्भर घटकाच्या तोंडात थूक नसता आमदारांनी वारेमाप उधळपट्टी करून आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करावा, ही बाब अशोभनीय आहे. रोम जळत असताना न्यूरा फिडल वाजवत होता अश्यातलाच हा प्रत्यय. लोकप्रतिनिधीकडून दुष्काळाऐवजी, करोना महामारीच्या मुकाबल्याऐवजी आपल्या वाढदिवस सोहळ्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सन २०१९(जुलै व सप्टेंबर) मध्ये झालेल्या अतिवृष्टित अमळगावसह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रूपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले. त्यांनतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला असून अजूनही उर्वरित ३२ गावे (सप्टेंबरमध्ये बाधीत)वंचित आहेत. हे प्रकरण अर्थविभागाकडे प्रलंबित आहे. अर्थमंत्री अजीत पवार आहेत. फडणवीसांसोबत पवारांच्या पहाटेच्या राज्य स्थापना शपथविधीचे अनिल पाटील साक्षीदार नव्हे तर राष्ट्रवादीच्या फुटीरवाद्यामधील बिनीचे शिलेदार होते, ते दिल्लीला सहलीलाही गेले होते हे सर्वश्रुत आहे. मग आपल्या नेत्याकडून वंचीत ३२ गावांचा रिलीफ फंड मिळविण्यासाठी इतका अवधी त्यांना का लागत आहे ? असाही प्रश्न यानिमित्ताने
उभा ठाकला आहे. तो रिलीफ फंड वंचीत शेतकऱ्यांना मिळवून देत आपण स्वतःच लावून घेतलेली भूमिपुत्र ही बिरूदावली सार्थ ठरवावी, एवढेच!असा संदेश अमळगाव येथील शेतकरी श्याम सोनवणे यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button