अवैध गौण खनिज वाहतूक ४ लाख ८७ हजार दंड वसूल !…प्रांत अधिकाऱ्यांची धडक कारवाई…
जितेंद्र गायकवाड
बोदवड दि .प्रांत अधिकारी रामशिंग सुलाने यांनी अचानक येथे आले असता त्यांनी जलचक। येथे सुरू असलेल्या दगडांच्या खाणी ची पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांना बोदवड जामनेर रस्त्यावर असलेल्या शासकीय गोदमजवळ दोन डंपर विना परवानगी डबर वाहतूक करतांना आढळले त्यांना प्रत्येकी दोन लाख ,त्रेचाळीस हजार सहाशे पाच रुपये दंड ठोठावला,विलास लक्ष्मण पाटील,यांना 2,43,605,रुपये,हरिओम शलिग्राम जैस्वाल ,2,43,605,या दोन्ही कडून एकूण 4 लाख,सत्यऐंशी हजार दोनशे दहा रुपये दंड वसूल करण्यात आला, विलास लक्ष्मण पाटील,जलचक्र बु!यांचे डंपर क्र, एम एच–१९-झेड,३०९८व हरिओम शलिग्राम जैस्वाल बोदवड,यांचे डंपर क्र, एम एच-१९-झेड-४०९८या दोन्ही डंपर मधून विना परवानगीने प्रत्येकी पाच ब्रास डबर वाहतूक करतांना आढळून आले, प्रांत अधिकारी रामशिंग सुलाने यांनी ही धडक कारवाई केली, त्यांचे सोबत तहसीलदार रवींद्र जागी,नायब तहसिलदार डी, एस कुसकर कारकून व्ही एस,डहाके,बोदवड तलाठी नीरज पाटील,शेलवड तलाठी मंगेश परिशे, इत्यादींचा यात समावेश होता, या वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई महसूल विभागाने केली आहे,अशीच मोठी कारवाई रात्रीच्या वेळी रेती ची चोरटी वाहतूक करणारावर करावी असे जागृत्नाग्रीकांतून होत आहे,






