Bodwad

बोदवड तालुक्यातील सुरवाडे खु.येथे ढगफुटी शेतकरी वर्गाचे पूर्णपणे नुकसान

बोदवड तालुक्यातील सुरवाडे खु.येथे ढगफुटी शेतकरी वर्गाचे पूर्णपणे नुकसान

जितेंद्र गायकवाड

बोदवड, दि.१४,सुरवाडे खु. येथे काल रात्री झालेल्या ढगफुटी च्या पावसामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. ह्या घटनेची माहिती मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांना मिळताच त्यांनी आज तात्काळ गावात भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व प्रशासकीय अधिकारी वर्गास पंचनामा करण्याचे आदेश दिले,सदर भागामध्ये ६० ते ७० एकर जमिनीचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पूर्णपणे नुकसान झाले.एका शेतकऱ्याचे बैलजोडी ही मेली.कपासी,ज्वारी, सोयाबीन, तूर,उडीद, मूग,ही उगलेली पिके पूर्णपणे अति पावसामुळे वाहून गेली.शेतीची सुपीक माती ही वाहून गेली.

काही शेतकरी वर्गाची ठिबक, पाईप,पूर्णपणे वाहून गेली.ह्या झालेल्या मोठ्या हाणीमुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला,आता काय करावं त्याला कळेनासे झाले.अगोदरच कोरोना व्हायरस चे संकट आता हे ढगफुटी चे व येणारे पुढील वर्ष हे नुकसानीचे ह्या विचाराने शेतकरी वर्ग आधारहीन झाला.त्यामुळे त्याला फक्त आशा ही आता शासनावर आहे. ह्या शेतकरी वर्गाची आशा शासन पूर्ण करणार का ?

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button