Bodwad

काँग्रेसच्या वतीने तीन केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम…

काँग्रेसच्या वतीने तीन केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात स्वाक्षरी मोहीम…

काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रातून 2 कोटी स्वाक्षरीचे लक्ष

युवक काँग्रेस कडून शनिवारी जामठीच्या बाजारात स्वाक्षरीचे कार्यक्रमाचे नियोजन

प्रतिनिधी/ रफिक अत्तार

बोदवड: केंद्र सरकारने परित केलेल्या तीन कृषी कायद्याचा विरोधात बुधवारी बोदवड कॉंग्रेस कमिटीच्या वतीने बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी अधिनियम विरोधात शेतकरी यांच्या सह्याची मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेस शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या अभियाना अंतर्गत उद्यापासून तालुक्यातील प्रत्येक गावात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आले आहे.

या काळ्या कायद्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती व्यवस्थाच नष्ट होणार. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव व बाजारभाव मिळणार नाही. जो पर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेस शेतकऱ्यांसाठी नेहमी लढत राहील : जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील

करार शेतीमध्ये वाद झाल्यास शेतकऱ्यांला न्यायालय व प्रशासनाकडे करावी लागणार पायपीट: जेसू पाटील

कामगार मजूर आडते मुनींना हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होणार: तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले

या कार्यक्रमाला उपस्थिती मध्ये युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील, माजी सभापती वीरेंद्रसिंग पाटील, तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, शहरध्यक्ष मेहबूब शेख, दिलीप सिंग पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, डॉ. सुधीर पाटील, विजयसिंग पाटील, विनोद मायकर, सागर पाटील, प्रकाश पाटील, दिलीप माळी, विकास कोरेजा, अशोक तायडे, बाळू पाटील, भरत पाटील, तुकाराम राणे, विजय देवराम पाटील इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button