Amalner

?️ अमळनेर कट्टा… राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेव्दारा अमळनेर येथे निवेदन

?️ अमळनेर कट्टा… राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेव्दारा अमळनेर येथे निवेदन-

अमळनेर : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने दि.२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यात, 358 तालुक्यात पदोन्नतीच्या कोट्यातील ३३% आरक्षित पदे दिनांक २५/०५/२००४ च्या आदेशाप्रमाणे मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनाच पदोन्नती देऊन भरणेबाबत आज अमळनेर तालुका राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ अंतर्गत “प्रोटान” च्या वतीने मा. तहसिलदार यांच्या वतीने म.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शासन निर्णय क्रमांक बीसीसी-२०१८/प्र.क्र.३६६/१६ – ब दिनांक १८/०२/२०२१ चा शासनादेशानुसार उपरोक्त विषयास अनुसरुन निवेदन सादरकरण्यात आले की, भारतीय संविधानाच्या कलम १६ मधील १६(१), १६(२), १६(४), १६(४)अ, १६(४)क नुसार शासनाला अनुसूचति जाती-जमाती, नि अधिसुचित जाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा बनविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने सन २००४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८ हा अनुसूचति जाती-जमाती, निरअधिसुचित जाती, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा संमत केला आहे. महाराष्ट्र शासनाने संविधानातील कलम १६ च्या तरतुदींना आणि २९/०१/२००४ च्या आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासन आदेश क्र. बीसीसी- २००१/१८९७/प्र.क्र.६४/०१/१६ – ब दिनांक २५/०४/२००४ चा शासन आदेश निर्गमित करून या शासन आदेशान्वये मागासवर्गीयांना ३३ टक्के आरक्षण देवून, पदोन्नतीच्या सर्व टप्यांमध्ये सर्व संवर्गाना आरक्षणाचे तत्व लागू केले आहे.
त्यामुळे देशातील तमाम मूलनिवासी बहुजनांचे खच्चीकरण होणारे निर्णय हे अन्यायकारक असल्याने सर्वत्र असंतोष निर्माण होत आहे अशी भावना यात व्यक्त करण्यात आली आहे. अमळनेर नायब तहसिलदार मा.पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना प्रोटान जिल्हा महासचिव मा. मिलिंद निकमसर, उपाध्यक्ष मा. सोपान भवरेसर, तालुका सचिव मा. मुनाफ तडवीसर, तालुका सहकोषाध्यक्ष मा. दिनेश मोरेसर आदी उपस्थित होते.
मा. शिवाजीराव पाटीलसर, मा. प्राचार्य चंद्रकांत जगदाळेसर, प्रोटान विभागीय सदस्य प्रा.डॉ.राहुल निकमसर, प्रा.एम.एन.संदांशिवसर, प्रोटान विद्यापीठ सचिव प्रा. विजय खैरनारसर, प्रा. लिलाधर पाटीलसर, मा. रणजित शिंदेसर, प्रोटान जिल्हाउपाध्यक्ष मा.आर.बी.पाटीलसर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.गूलालेसर, प्रा. विजय गाढेसर, प्रा. जितेश सदांशिवसर, मा. कमलाकर संदांशिवसर, तालुकाध्यक्ष मा.डी.ए.सोनवणे सर, तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम माळीसर, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटने तालुकाध्यक्ष मा.बैसाणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.विजय वाघमारेसर, मा.नंदकुमार पाटीलसर, मा.किरण मोहितेसर, मा.निरंजन पेंढारकरसर, मा.दत्तात्रय सोनवणेसर, मा.देविदास घोडेस्वारसर, मा.संजय पाटीलसर, मा.जितेंद्रसिंह ठाकुरसर, मा.महेंद्र रामोशीसर, मा.अजय भामरेसर, मा.जितेंद्र पाटीलसर, मा.पंडित भदाणेसर, मा.जितेंद्र बिऱ्हाडेसर, मा.शैलेश साळूंकेसर, मा.महेशकुमार पारेरावसर, मा.रोशन साळुंखेसर, मा.किशोर सोनवणेसर, मा.योगेश्वर पाटीलसर, मा.सुनील सोनवणेसर, मा.आ.बा.धनगरसर, मा.ठोके भाऊसाहेब, मा.प्रमोद साळुंखे भाऊसाहेब यांचे सहकार्य लाभले.

?️ अमळनेर कट्टा... राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेव्दारा अमळनेर येथे निवेदन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button