Patur

?️ Big Breaking….टिक टॉक व्हिडिओ बनवून जातीय तेढ निर्माण करणारा आरोपी पातूर पोलीस स्टेशन मधे जेरबंद

टिक टॉक व्हिडिओ बनवून जातीय तेढ निर्माण करणारा आरोपी पातूर पोलीस स्टेशन मधे जेरबंद

प्रतिनिधी/विलास धोंगडे

आज माता रमाबाई भीमराव आंबेडकर ह्यांचा स्मृतीदिन त्यांच्या स्मृतीदिनि संपूर्ण बौद्ध अनुयायी आपापल्या घरी राहून लॉक डाउन मुळे आपल्या घरीच सर्वांनी अभिवादन केले.परंतु पातूर तालुक्यातील बेलतळा ह्या गावातील युवकाने जातीय तेढ निर्माण करून मातोश्री रमाबाई ह्यांचा गाण्यावर जिवंत उंदराला गळफास देतानाचा व्हिडिओ शुभम चव्हाण ह्याने आपल्या टिक टॉक आयडी वरून प्रसारित केला.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या आयुष्याची अर्धांगिनी व समस्त बौद्ध धम्माची मातोश्री रमाबाई ह्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या भावनांवर आधारित सुप्रसिद्ध गीत “तुझ्या विना रमा मजला सुने सुने सारे जग वाटे,
सोडून मजला रमा चालली तू कोठे” ह्या गीतावर हा व्हिडिओ हेतुपुरस्पर पणे प्रसारित केला.त्यामुळे अकोला जिल्ह्यासह संपुर्ण देशामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले व तमाम बौद्ध अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या ह्यासाठी पातूर तालुक्यातील सागर इंगळे,निर्भय पोहरे, आकाश हिवराळे,ऍड. विजय बोरकर,दिनेश गवई,मंगल डोंगरे,सचिन सुरवाडे,बाळू सुरवाडे,शुभम धाडसे ह्यांनी पातूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार गुल्हाने साहेब ह्यांच्याकडे तक्रार देऊन ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी केली.व त्याच क्षणी पातूर पोलिस स्टेशन ठाणेदार ह्यांची टीम तात्काळ जाऊन आरोपीला अटक करून आणले व आरोपीवर कलम
295 A व 66 (f) व अनुसूचित जाती जमातीअत्याचार प्रतिबंधात्मक कायदा (अट्रोसिटी ऍक्ट ) अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.ही कार्यवाही अतिशय शीघ्र व तात्काळ करण्यासाठी पातूर तालुक्यातील बौद्ध अनुयायांनी विनंती केली व त्याच अनुषंगाने पातूर पोलिस स्टेशन चे ठाणेदार गुल्हाने साहेब व त्यांच्या टीम नि कार्यवाही केली व आरोपीला जेरबंद केले.परंतु अशा समाजविघातक विकृतींचा कायदेशीर निर्णय होऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होतेच परंतु जे कोणी सोशल मीडिया व टिक टॉक वापर करत असणार त्यांनी समाजविघातक कृत्य होणार नाही ह्याचे भान ठेवूनच वापर करावा अन्यथा टिक टॉक करेल तुम्हाला जेल मधे कैद.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button