Mumbai

?महत्वाचे…8 वी ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय..!काय आहे निर्णय..!

?महत्वाचे…8 वी ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय..!काय आहे निर्णय..!

महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने राज्यांतील कोरोनामुक्त भागांतील शाळांमधील 8 ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात यावे हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थानाच्या ठरवांना शासन निर्णयात जारी करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यांत 8 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येतील.शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, सकाळी आणि दुपारी महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत शासनानं दिलेल्या कार्यपद्धतीचं पालन करण्यात यावं,असं शालेय शिक्षण विभागानं सांगितलं आहे.
कोरोना संबंधित ज्या अधिसूचना देण्यात येतील त्यांचे पालन होणे गरजेचे आहे.मास्कची सक्ती करण्यात यावी.शाळेत हात धुण्याची व्यवस्था असावी.एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे.

स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात यावी.वर्गात देखील एका बाकावर एका विद्यार्थी असे बसवावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button