Amalner

देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रबोधन

देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रबोधन

अमळनेर
आज समाजात अंधश्रद्धांचे प्रमाण वाढलेले आहे.हे प्रमाण समाजातील शिक्षीत समाजात जास्त आहे. सावित्रीबाई फुले यांनी कधीही कर्मकांड व उपासतापास केले नाही. देशातील महीला शिक्षीत झाली पाहिजे यासाठी फुले दाम्पत्यांनी आपले आयुष्य वेचले,कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडले नाही. श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी असे प्रखर मत देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांच्या वतीन विद्यार्थीे प्रबोधन कार्यक्रमात संस्थेच्या तारादूत अर्चना सोनवणे बोलत होत्या.

देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रबोधनत्या पुढे म्हणाल्या कि आजही स्त्रीला दुय्यम लेखले जाते. स्त्रीपुरुष समानता म्हटले जाते पण आपल्या पाहिजे त्या प्रमाणात पहायला मिळत नाही.समाजात अंधश्रद्धा कशा पसरतात त्या उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. शासन हागणदारीमुक्तीसाठी अनुदान देते.पण आपण पैसे इतरत्र खर्च करतो व उघडयावर शौचाला बसून आपले आरोग्य धोक्यात घालतो.म्हणून शौचालयाचा वापर करण्यासाठी त्यांनी आवाहन केले. ताराबाई शिंदे,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभागातून मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, आय.आर.महाजन,
एस.के.महाजन होते.कार्यक्रमात तारादूत अर्चना सोनवणे यांचा सत्कार इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी नेहा पाटील हिने केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वआभार शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आय.आर.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button