फैजपूर

मातोश्री फाउंडेशन तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मातोश्री फाउंडेशन तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

फैजपूर ता यावल प्रतिनिधी सलीम पिंजारी
येथून जवळच असलेल्या पिंपरुड ता यावल येथील मातोश्री फाऊंडेशन व जि प शाळा च्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 सहावी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे 115 जयंती तसेच मातोश्री फाऊंडेशन चा पाचवा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला याप्रसंगी जि प शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून प्लास्टिक मुक्ततेची व ग्रामस्वच्छतेचे आववाहन करणारी प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांना व उपस्थितांना प्लास्टिक मुक्ततेची सामूहिक शपथ देण्यात आली तदनंतर मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील एडवोकेट प्रवीण जंगले होते याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी उपस्थितांना स्वावलंबनातून स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 सहावी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या प्लास्टिक मुक्त व स्वच्छता पंधरवड्याच्या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वावलंबनातून प्लास्टिक मुक्तता व स्वच्छता या बाबी स्वतःपासूनच सुरुवात करण्याचे नमूद केले मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी ग्रामस्थांना मुख्याध्यापक सलीम तडवी यांनी प्लास्टिक मुक्तता व स्वावलंबन स्वच्छतेची सामूहिक शपथ दिली साध्या नंतर डॉ भूषण जंगले बदलापूर जि ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी करून मधुमेह व अन्य रोगांच्या नागरिकांना वर्षभर मोफत औषधी पुरवठा करण्याचा संकल्प फाउंडेशन अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक जेवणाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.

याप्रसंगी सभा मंचवर ऍड प्रवीण जंगले, पिंपरूड माजी सरपंच भागवत पाटील, माजी मुख्याध्यापिका श्रीमती शालिनी चौधरी, डॉ भूषण जंगले, ज्येष्ठ नागरीक प्रा पी एस बोरोले,सामाजिक कार्यकर्ते संजय सराफ ,मुख्याध्यापक सलीम तडवी मान्यवर उपस्थित होते
आर के भोगे, यशवंत वारके,फालक गुरुजी, खेमचंद बोंडे, यशवंत धांडे, सुधाकर पाटील, व्हि ओ चौधरी ,युवराज लोधी ,नासिर शेख ,कामगार संघटना अध्यक्ष मालक शाकीर मिस्तरी, उपाध्यक्ष कबीर मिस्तरी, गोकुळ पाटील भास्कर चौधरी यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमा चे सूत्रसंचालन व प्रास्ताविक फाउंडेशन अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी तर आभार फाउंडेशन उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button