पातोंडा-सोनखेडी रस्ता मंजूर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांना शेतकऱ्यांनी दिले सामूहिक निवेदन…
रजनीकांत पाटील
पातोंडा ता. अमळनेर :- पातोंडा – सोनखेडी शेतरस्ता हा नाल्या-लगत असल्याने आणि सतत पडत पडलेल्या पावसाने रस्ताच नाल्यात वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असुन, सद्यस्थितीत माणूस देखील या रस्त्याने वापरू शकत नाही तर,शेतकऱ्यांनी मशागतीसाठी,शेतमाल आणण्यासाठी आणि बैलजोडी कोणत्या मार्गाने घेऊन जावे असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झाला आहे.तेव्हा सदर रस्त्याच्या मागणीसाठी आमदार अनिल पाटील यांना दि.13 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.यावेळी पातोंडा येथील शेतकरी श्री.झंझणे सर,श्री.नारायण माळी,श्री.सयाजी बोरसे,प्रवीण लाड,आसाराम माळी,एल.टी.नाना पाटील,राहुल पवार,हेमंत देशमुख,दिलीप बोरसे,समाधान बिरारी, नितीन लाड,प्रशांत माळी, रवींद्र लाड,हेमंत सोनवणे, हरिष लाड,बबलू बोरसे इ. उपस्थित होते.यावेळी आ. अनिल दादांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की;लवकरात लवकर पातोंडा-सोनखेडी रस्ता मंजूर करून मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.तसेच आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पंचनामाचा निधी मिळवून दिल्या बाबत सर्व शेतकऱ्यांनी आभार मानले.






