Yawal

शेती जमीनवर बोजा नसल्याचा बनावट दाखला तयार केल्या प्रकरणी कोर्टाच्या निर्देशानुसार उदळी खुर्द येथील तात्कालीन महिला तलाठी सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

शेती जमीनवर बोजा नसल्याचा बनावट दाखला तयार केल्या प्रकरणी कोर्टाच्या निर्देशानुसार उदळी खुर्द येथील तात्कालीन महिला तलाठी सह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- पतसंस्थेचे बनावट शिक्के तयार करून कर्जाचा बोजा असतानाही कर्ज नसल्याचा बनावट दाखला तयार करून थेट बोजा उतरवल्याप्रकरणी म्हणजे असून नसल्यासारखे केल्यामुळे एका महिला तलाठी सह सदरील शेत जमीन घेणारे व देणारे विरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक घटना जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,जय श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून उदळी खुर्द ता.रावेर येथील दिनकर किसन नेमाडे यांनी १२ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. सब त्यांच्या मालकीच्या शेत गट नंबर ८५ / ब या मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर या कर्जाचा बोजा तारण म्हणून बसवण्यात आला होता. कर्ज थकबाकीदार दिनकर किसन नेमाडे यांनी थेट संस्थेचे बनावट शिक्के,लेटरहेड तयार करून कर्ज नसल्याचा निलचा बनावट दाखला तयार केला. त्या बनावट दाखल्याच्या आधारे उताऱ्या वरील एकूण १२,३५,१७७ रुपयांचा बोजा तलाठ्याकडून उतरविला व सदरची शेत जमीन थेट नारायण कोळी यांना सन २०१८ मध्ये विकली.सदर प्रकरणाची माहिती जय श्रीराम ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्थेचे दीपक भास्कर राणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केल्याने कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार शेतकरी दिनकर नेमाडे, शेत जमीन खरेदी करणारी नारायण कोळी आणि कोणतीही सहनशहा न करता दाखला देणाऱ्या उधळी खुर्द तालुका रावेर येथील तात्कालीन तलाठी रेखा जोरवार या तिघांच्या विरोधात सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button