संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिवस साजरा
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर शहरातील मुंदडा नगर येथील प्रति शेगाव व भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज मंदिरात जागतिक पारायण दिनानिमित्ताने महिला व पुरुष एकूण 25 जण पारायणाला बसले.
संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक उपक्रम राबवले जातात यासाठी संस्थांचे अध्यक्ष प्रा. आर .बी. पवार व संचालक मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.
संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक तालुक्यातून जिल्ह्यातून येत असतात.
जागतिक पारायण दिनानिमित्त पारायणासाठी ज्योती पवार, सुनील पाटील ,उर्मिला जगताप ,सरला चव्हाण ,शोभा कोळी, वंदना भारती व भाविक महिला व पुरुष बसले आहेत.गजानन विजय यातील २१ अध्यायांचे अखंड पारायणास बसले आहेत.






