करोना व्हायरस संबंधी पशुसंवर्धन अधिकारी व व पोल्ट्री फार्म चे शेतकरी यांची बैठक
कमलेश चौधरी
पारोळा करोना व्हायरस संबंधी पशुसंवर्धन अधिकारी व पोल्ट्री फार्म शेतकरी यांची बैठक नुकतीच पारोळा मार्केट कमिटीच्या मीटिंग सभागृहात घेण्यात आली.त्यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सूर्यवंशी, डॉक्टर पवार, डॉक्टर विजय पवार प्रीमियम पोल्ट्री फार्म,डॉक्टर आर.एन. पाटील इंडियन बॉयलर,किशोर पाटील डीलर गोदरेज त्याचप्रमाणे पोल्ट्री फार्म चे मालक मन्साराम चौधरी,योगेश चौधरी,मल्हार भाऊ, अमोल पाटील, राहुल चौधरी,आबा चौधरी,पांडुरंग पाटील,गिरीश महाजन, संदीप पाटील व इतर पोल्ट्री फार्म व्यवसायिक त्याचप्रमाणे जुबेर खाटीक ,शरीफ खाटीक,अक्त्तर खाटीक,आरिफ खाटीक हे सर्व या वेळी उपस्थित होते.यावेळी पोल्ट्री फार्म वरील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली त्यात माहिती देण्यात आली की सोशल मिडियाने वायरस बाबत जे चुकीचे मेसेज पाठविण्यात आले किंवा फॉरवर्ड करण्यात आले.

अशा समाजविघातक व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.पशुसंवर्धन व विकास खाते तसेच तज्ञ डॉक्टरांची मते समाजासमोर मांडण्यात आली. जेणेकरून पोल्ट्री बद्दल असलेल्या चुकीच्या गैरसमजुती चे निराकरण करण्यात मदत होईल. पशुसंवर्धन अधिकारी यांनी सांगितले की करोना वायरस हा पक्षांमध्ये नाही असा शासनाने निर्णय दिलेला आहे.म्हणून नॉनव्हेज (कोंबडी )खाण्यास हरकत नाही.किशोर पाटील यांनी यावेळेस सांगितले की अफवांवर विश्वास न ठेवता कोंबडी खाण्यास हरकत नाही.त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,धुळे,मालेगाव,नाशिक,अमळ–नेर येथ कोंबडीच्या मटणाचे भाव कमी करण्यात आले आहेत.तुम्ही सुध्दा पारोळ्यात कमी करा.कँपनीचे जिवंत कोंबडीचे रेट जर ३५रुपये मिळत आहे.तर आपणास १००रु.किलो प्रमाणे कोंबडीचे मटण देण्यास हरकत नाही. खाटीक लोकांना ते पटले नसून त्यांनी रेट कमी न करता तसेच सुरू ठेवले.त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकां पैकी राहुल चौधरी याने बस स्टँड च्या समोर कोंबडी मटण विकण्यास सुरुवात केली असून कॉकरेल १८०रुपये किलो तर बॉयलर १०० रुपये किलो.असा रेट ठेवण्यात आलेला आहे. भारतीय संस्कृतीत अन्न हे शिजवून खाल्ल्यामुळे त्यात कुठल्याही प्रकारच्या वायरस राहत नाही असे तज्ञ डॉक्टरांनी सांगितले.






