Chalisgaon

सर्पमित्र मयुर कदमने पकडला भला मोठा अजगर

सर्पमित्र मयुर कदमने पकडला भला मोठा अजगर

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले

चाळीसगाव – घाटारोड वरील पटेल ढाब्यासमोर असलेल्या तालुक्यातील सांगवी फाट्याजवळ

विनायक दवे यांच्या शेतात असलेला भला मोठा अजगर सर्पमित्र मयुर कदम याने आज दि 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास पकडला असून त्यास लागलीच जंगलात सोडून दिला आहे.

विनायक दवे यांच्या शेतात अजगर दिसल्याने तेथील कामगारांची एकाच धांदल उडाली लागलीच याची माहिती पंचशील नगर चाळीसगाव येथील सर्पमित्र मयुर कदम याला दिल्यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी जाऊन अथक परिश्रमानंतर भला मोठा वजनदार व लांबलचक अजगर मोठ्या शिताफीने पकडला व लागलीच त्याला जंगलात सोडून दिला व त्याचे प्राण वाचवले त्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button