Maharashtra

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड… आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख…..

 जनादेश यात्रेत मुख्यमंत्रीच्या यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड…
आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख…..

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड... आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख.....

 अमळनेर संपादकीय राजकीय विश्लेषण प्रा जयश्री साळुंके दाभाडे
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या अमळनेर मतदार संघातील भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते गुढगघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.यात हवशे ,नवशे ,गवशे सर्वांची लगीन घाई सुरू झाली आहे.

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड... आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख.....
मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेच्या प्रसंगी चित्र थोडे स्पष्ट होईल असे वाटले होते परंतु अजूनही थोडे अस्पष्ट चित्र आहे तरीही काही उमेदवार आपल्याला हळदच लागली या अविर्भावात वावरत आहेत.प्रत्यक्ष यात्रे दरम्यान अनेक घटना घडल्या आहेत ज्यावरून थोडे अंदाज करणे जरी शक्य असले तरी अजून कुणीही भुरळून न जाता पैसे देऊन बातम्या लावणे बंद केले तर बरे होईल कारण वस्तुस्थिती पूर्ण पणे वेगळी दिसून येत आहे.
▶माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या वरील अविश्वास स्पष्ट पणे विचारून मुख्यमंत्री यांनी त्यांना खजील केले आहे. करण सत्ते साठी एका रात्री पक्ष बदलणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांची  पत्नी नगराध्यक्षा  भाजप  मध्ये आणि ते स्वतः राष्ट्रवादी मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
▶माजी आमदार कृषिभूषण यांना धनादेश देण्यासाठी भुसावळ येथे जावे लागले ते अमळनेर येथे पाच मिनिटं मुख्यमंत्री यांना थांबवू शकले नाहीत. यावरून त्यांच्या एकूणच अस्तित्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड... आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख.....
▶पारोळा येथील भाजप चे नगराध्यक्ष करण पवार हे मुख्यमंत्री यांच्या सोबत गाडीत वरती उभे होते त्या तुलनेत अमळनेर च्या नागराध्यक्षांना  मात्र ही संधी मिळाली नाही यामागील कारणे स्पष्ट आहेत.

जनादेश यात्रेत मुख्यमंत्री यांच्या समोर येण्याची स्थानिक नेत्यांची धडपड... आमदार स्मिता वाघ यांना दाखवावा लागला पास, द्यावी लागली ओळख.....
▶विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना आपली ओळख द्यावी लागली तसेच त्यांना पासही दाखवावा लागला.यावरून त्यांची ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे किती ओळख आहे हे सिद्ध झाले आहे.
▶मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषदेच्या  आमदार स्मिता वाघ यांना गाडीतही बसू देण्यात आले नव्हते.त्यांना अमळनेर मतदारसंघात महाजनादेश यात्रेने प्रवेश केल्यानंतर गाडी वर बसू देण्यात आले.
▶महाजनादेश यात्रेच्या प्रसंगी हेडावे फाट्या जवळ मात्र मुख्यमंत्री दहा मिनिटं थांबले तेथे त्यांनी ठाकूर जमातीचे निवेदनही स्वीकारले. ह्या फाट्यावर आमदार शिरीष चौधरी मित्र परिवाराने स्वागत केले होते.
▶सर्वात महत्वाचे म्हणजे फरशी रोड वरील एकत्रित जातीयवादी भाजप तिकीट मिळविण्यासाठी  प्रयत्नात असलेले सर्व तथाकथित नेत्यांचीच जास्त गर्दी होती त्यातुलननेत कार्यकर्ते कमी होते त्यामुळे जे शक्ती प्रदर्शन सर्वांनी एकत्रित पणे केले हे न समजण्या इतके मुख्यमंत्री अजाण नाहीत.
या सर्व पार्श्वभूमीवर कोणीही अजून गुडघ्याला बाशिंग बांधू नये तिकीट कोणाला मिळेल हे ज्यांनी कामे केली आहेत,ज्यांचा वारंवार जनतेशी संपर्क आहे,जे जातीयवादी नाहीत,हे निकष असणार आहेत.
त्यामुळे कुणीही हुरळून न जाता वाट पहावी.
जनतेमध्ये अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहे .सूत च्या विरोधात दूध आलं ,सर्व समाज एक होऊन पाहिजे तसं शक्ती प्रदर्शन दाखवू शकला नाही बहुजन समाजाला विश्वासात घेतले जात नाही,विकासाच्या नावाखाली फक्त श्रेय घेण्याचे आणि पोस्टर बाजीचे दर्शन होते, असे अनेक मुद्दे जनतेच्या चर्चेत आहेत.
या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून उलट भाजप मधील दुफळी स्पष्ट झाली आहे.एका रात्रीत पक्ष बदलणारे, अविश्वासू फक्त कागदोपत्री आकडे बोलणारे पोपट,श्रेय घेण्यात पटाईत असलेल्या ताई यावर नक्कीच पक्ष श्रेष्ठी तिकीट देताना विचार करतील.वरील सर्व घटना क्रम पाहता कोण किती पाण्यात आहे हे देखील स्पष्ट होते आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button