Chalisgaon

तलवारीच्या टोकावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले मात्र ते चालविले लोकशाही मार्गाने – शिवव्याख्याते संतोष विरकर

तलवारीच्या टोकावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले मात्र ते चालविले लोकशाही मार्गाने – शिवव्याख्याते संतोष विरकर

!! रयत सेना आयोजित व्याख्यानात प्रतिपादन !!

मनोज भोसले

चाळीसगाव – तलवारीच्या टोकावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले मात्र ते चालविले लोकशाही मार्गाने स्वराज्यात माहिलेला मातेचा दर्जा होता मात्र सध्याच्या युगात महिला व मुलीवर अन्याय अत्याचार सुरू आहेत ते थांबविण्यासाठी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरीत्र वाचुन अन्यायाला मातीत गाडले पाहिजे असा संदेश छत्रपती शिवाजी महाराज व आजचा तरुण या व्याख्यानातून शिवव्याख्याते संतोष विरकर यांनी दि १९ रोजी रयत सेनेच्या वतीने शहरातील भडगाव रोड वरील अंधशाळेच्या पटांगणावर शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्याना प्रसंगी केले.

तलवारीच्या टोकावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले मात्र ते चालविले लोकशाही मार्गाने - शिवव्याख्याते संतोष विरकरयाप्रसंगी व्यासपीठावर
माजी आमदार साहेबराव घोडे, संचालक बाजार समिती रमेश चव्हाण, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेनदादा पाटील,पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड , चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, कार्यक्रम आयोजक रयत सेना संस्थापक गणेश पवार,जि प सदस्य पोपट भोळे,शशिकांत साळुंखे, जिल्हा दुध संघ संचालक प्रमोद पाटील,डॉ सुनिल राजपुत ,प स सभापती अजय पाटील, उपसभापती सुनिल पाटील,मा उपसभापती संजय पाटील,प्रा गौतम निकम ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिनेश पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष प्रा सुनिल निकम ,शहर अध्यक्ष घुष्णेश्वर पाटील,आपला ग्रामस्थ संपादक किसनराव जोर्वकर ,रा वि संचालक शेषराव पाटील,समता परीषदेचे अध्यक्ष सतीश महाजन,नगरसेवक सुरेश स्वार ,रामचंद्र जाधव,संजय राजपूत, दीपक पाटील, नितीन पाटील, राजेंद्र चौधरी ,सदाशिव गवळी, भगवान राजपूत,पत्रकार संघाचे अध्यक्ष आर डी चौधरी सचिव एम बी पाटील ,सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख , यु डी माळी ,नानाभाऊ पवार अदि मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरूवातील स्वराज्य निर्माण सेनेच्या मावळ्यांच्या शिव वंदनेने झाली,किरण संजय पाटील या विद्यार्थ्यांने शिवरायांच्या जीवनावर बहारदार भाषन केले तर नंदिनी विनोद गादीकर या चिमकुलने पोवाडा म्हटला , शिवाजी साळुंखे यांनी गित म्हटले .कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी बोलताना सांगितले की रयत सेनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ,आरोग्य शिबिरे,विविध आंदोलने करण्यात येवून अनेक लोकांचे प्रश्न सोडविल्याचे समाधान असल्याचे सांगितले तर व्याख्याते संतोष वीरकर पुढील बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात वतनदारी पद्धत बंद करून वेतन पद्धत सुरू केली आणि रयतेचे स्वराज्य स्थापन केले त्यांचा मुख्य केंद्र मंडळ रयत होती म्हणून प्रत्येक माणसाला स्वराज्य आपले वाटू लागले की होय हे माझे स्वराज्य आहे शिवरायांचा लढा हा धार्मिक नव्हता तर राजकीय होता असे असताना त्यांना एका धार्मिक जातीत बांधून ठेवणे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा अपमान आहे शिवरायांच्या जागतिक किर्तीचे राजे आहेत त्यांच्याविषयी अल्बटन टायबर नावाचा विचारवंत म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो मात्र आपल्या भारतात आजही शिवराय अनेकांना समजले नाही छत्रपती शिवाजी महाराज नौसेनेचे जनक होते कारण त्यांना माहीत होते की शत्रू समुद्रमार्गे हल्ला करू शकतो म्हणून त्यांनी स्वराज्यात आरमार उभे केले होते २६ / ११ चा मुंबईवरील हल्ला देखील समुद्रमार्गे झाला आणि मुंबई ५८ तास अतिरेक्यानी वेठीस धरली होती जर इथल्या शासन व प्रशासनाने शिवचरित्राचा अभ्यास केला आणि त्याची अंमलबजावणी केली तर पुन्हा असा हल्ला होऊ शकत नाही मात्र तसे होताना दिसत नाही स्वराज्यात मावळे निर्व्यसनी होते कारण छत्रपती शिवरायांनी कधीही व्यसन केले नाही म्हणूनच या तरुणांनी शिवचरित्रातून शिकलं पाहिजे आणि निर्व्यसनी झालं पाहिजे महाराष्ट्रातील हिंगणघाट येथे फुलराणीला जिवंत जाळून मारले असे स्वराज्यात कधीच खपवुन घेतले जात नव्हते राज्यांच्या पाटलाने एका महिलेला बाटवले तर त्याचा चौरगा केला . स्वराज्यात महिलेला मातेचा दर्जा होता मात्र पर स्रीवर अन्याय अत्याचाराची गय केली जात नव्हती मग जवळचे सोयरे धायरे असले तरी त्यांना शासन केले जात असे मात्र भारतात महिला मुली सुरक्षित नाहीत इथली व्यवस्था अपराधीला शिक्षा देण्यास कुचकामी ठरत आहे कडक कायदे करणे गरजेचे झाले आहे अन्यथा महिला व मुलींना इथले राक्षस मुक्तपणे फिरू देणार नाही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतच राहतील आणि आपण दोन दिवस निषेध करून गप्प बसण्या पलीकडे काहीच करू शकत नसलो तर शिवरायांच्या शिवचरित्रातुन काय शिकणार आहोत म्हणून एकतेचे वज्रमुट आवळून लिंगपिसाट औलादीना वेळीच धडा शिकविणे गरजेचे झाले आहे . शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या टोकावर मात्र ते चालविले लोकशाही पद्धतीने घेतल्या ७५ हजार उपजाती व ५ हजार जातीला एकतेच्या सूत्रांमध्ये त्यांनी बांधले आणि नाव दिले मावळा. शिवरायांनी गुलामगिरी व्यवस्था नाकारली ते कधीच कोणावर अत्याचार होऊ देत नव्हते आणि सहनही करून घेत नव्हते अशा महान महापुरुषांचा विचार तरुणांनी आत्मसात केला पाहिजे . राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्या ठिकाणी पूजा करून पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली आणि बहुजन समाजाला त्यांचे विचार समजावेत म्हणून पहिले पुस्तक लिहिले व १ हजार ८ ओळीचा पोवाडा त्यांनी लिहिला .शिवचरीत्राचा अभ्यास करून छत्रपती शिवरायांचे विचार तरुणांनी आत्मसात केल्यास त्यांचे भविष्य झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत प्रत्येक माणसाच्या घरात पुस्तकाचे कपाट असणे गरजेचे असल्याचे संभाजीनगर येथील शिवव्याख्याते संतोष विरकर यांनी याप्रसंगी आवाहन केले कार्यक्रमास रेड स्वस्तिक सोसायटी सचिव आनंदराव साळुंखे ,ॲड विलास पाटील,ॲड भागवत पाटील,स्पनिल कोतकर ,सुमित भोसले, मनोज भोसले, वाघळी चे सरपंच विकास चौधरी,प्रा साधना निकम ,जयश्री माळी ,दिनकर कडलक,प्रगत संस्थचे अध्यक्ष खुशाल पाटील,राकेश बोरसे ,राहुल वाकलकर, संजय पाटील ,स्वप्नील जाधव, सतीश पवार ,दिलीप पवार ,बाळासाहेब पवार, मुकेश गोसावी,सुजित माळी , आरबी जगताप विकास बागड,दिलीप गवळी , वाय आर सोनवणे, भैय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, सचिन आव्हाड, अजय शुक्ल, उंबरखेड चे रवींद्र पाटील.दिपक पाटील ,कैलास गावडे ,आकाश पोळ तर रयत सेनेचे ज्ञानेश्‍वर कोल्हे, पि एन पाटील ,योगेश पाटील, मनोज पाटील, देवेंद्र पाटील, विकास पवार ,विलास मराठे,दिनेश चव्हाण, मंगेश देठे ,प्रदीप मराठे , सुनील निंबाळकर ,दीपक देशमुख, छोटू अहिरे, रवींद्र जाधव, संतोष मेटकर, रवी पाटील, सागर पाटील दीपक चव्हाण, किरण पवार, दत्तु पवार,योगेश पवार, बंटी पवार,चेतन निकुंभ,सतीश निकुंभ,अदि तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कापसे ,प्रमोद वाघ, स्वप्निल गायकवाड ,सागर यादव, दत्ता पवार, किशोर, पाटील, विलास पाटील,जयदीप पवार, गौरव पाटील ,अनिकेत शिंदे यांनी परीश्रम घेतले .कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम निकम यांनी तर आभार सचिन नागमोती यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button